वेळीच सावध व्हा! वाढत्या युरिक अॅसिडमुळे होतात ‘हे’ गंभीर आजार.!!!
जाणून लक्षणे अन् प्रतिबंधात्मक उपाय
वेळीच सावध व्हा! वाढत्या युरिक अॅसिडमुळे होतात ‘हे’ गंभीर आजार.!!!
जाणून लक्षणे अन् प्रतिबंधात्मक उपाय
युरिक ॲसिडचे प्रमाण वाढणे ही वाढत्या वयाची समस्या मानली जाते. रक्तातील युरिक अॅसिडची वाढ लवकर लक्षात येत नाही. त्याच्या वाढत्या पातळीमुळे हाडांशी संबंधित गंभीर आजार होतात. जेव्हा रक्तात युरिक अॅसिड वाढते तेव्हा शरीर काही संकेत देते.
त्यामुळे हे संकेत ओळखून त्यावर उपचार करणे गरजेचे ठरते. जर युरिक अॅसिडमुळे सांधे खराब झाले तर ते बरे करणे खूप कठीण जाते.
जेव्हा शरीरात युरिक अॅसिडची पातळी वाढते तेव्हा मूत्रपिंड ते फिल्टर करु शकत नाही. त्यानंतर सांध्यातील पेशींमध्ये युरिक अॅसिड जमा होऊ लागते, ज्यामुळे सांध्यांच्या समस्या सुरु होतात. याशिवाय, मूत्रपिंडातही युरिक अॅसिड जमा होते, ज्यामुळे किडनी स्टोन, हृदयरोग आणि मधुमेह सारखे आजार होतात. याचसाठीच युरिक अॅसिड निर्माण करणाऱ्या पदार्थांचे सेवन करणे टाळावे.
दरम्यान, प्युरिन प्रथिने शरीरात युरिक अॅसिड तयार करण्यास जबाबदार असते. उच्च प्रथिनेयुक्त पदार्थांमध्ये हे प्रथिने मोठ्या प्रमाणात असतात. शरीरात तयार होणाऱ्या सुमारे 60 ते 65 टक्के युरिक अॅसिड मूत्रपिंड फिल्टर करतात. उर्वरित यूरिक आम्ल आतडे आणि पित्त मूत्राशयाद्वारे उत्सर्जित होते.
Uric Acid: प्रोटीन्स वाढवतात यूरिक अॅसिड? जाणून घ्या नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणत्या गोष्टी खाव्यात.लक्षणे
जेव्हा शरीरात युरिक अॅसिड वाढते आणि ते जमा होऊ लागते तेव्हा सर्वात पहिल्या वेदना लहान सांध्यांमध्ये होतात. हात आणि पायांच्या बोटांच्या सांध्यामध्ये तीव्र वेदना होऊ लागतात. तसेच, पायाच्या सांध्यामध्ये तीव्र वेदना आणि सूज येते. अशा परिस्थितीत, या समस्येवर तात्काळ उपचार सुरु करावेत. जर युरिक अॅसिडच्या समस्येवर उपचार केले नाहीत तर स्थिती अधिक गंभीर होते.
प्रतिबंधात्मक उपाय
युरिक अॅसिडमुळे होणाऱ्या आजारांपासून बचाव करण्यासाठी हेल्दी फूड खावे. तसेच, जास्त प्रथिने असलेल्या आहारापासून (Diet) दूर राहावे. याशिवाय, पाण्याचे प्रमाण वाढवण्यासोबतच, तुम्ही तुमच्या आहारात उच्च फायबर आणि व्हिटॅमिन सी असलेले पदार्थ समाविष्ट केले पाहिजेत. दारु आणि धूम्रपानापासून दूर राहिले पाहिजे. यासोबतच तुम्ही तुमचे वजनही नियंत्रणात ठेवले पाहिजे.