क्राईमजळगावमहाराष्ट्र

पाचोरा बसस्थानक परिसरात भरदिवसा गोळीबार२६ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू•घटनास्थळावरून आरोपी पसार,मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथक रवाना.!!!

पाचोरा बसस्थानक परिसरात भरदिवसा गोळीबार२६ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू•घटनास्थळावरून आरोपी पसार,मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथक रवाना.!!!

पाचोरा प्रतिनिधी :-

पाचोरा शहरातील बसस्थानक परिसरात रविवारी सकाळी घडलेल्या धक्कादायक गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण शहर हादरून गेले असुन मोटरसायकलवरून आलेल्या अज्ञात मारेकऱ्यांनी आकाश कैलास मोरे (वय २६, रा. छत्रपती शिवाजी नगर, पाचोरा) याच्यावर भरदिवसा गोळ्या झाडून त्याचा जागीच खात्मा केल्याची घटना घडली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की पाचोरा बसस्थानक परिसरात भर दिवसा गोळी करीत एका २६ वर्षीय तरुणाचा मुत्यु झाल्याची घटना घडली असता सदर घटनेनंतर मारेकरी घटनास्थळावरून तात्काळ पसार झाला या गोळीबाराची माहिती मिळताच पाचोरा पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत पाचोरा पोलिसांनी परिसराची पाहणी करत मृतदेह ग्रामीण रुग्णालयात हलवला,असता तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले आहे.

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथक तयार करण्यात आले आहे. संपूर्ण शहरात नाकाबंदी करण्यात आली असून, बसस्थानक परिसरातील तसेच मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहेत.

जिल्हा पोलिस अधीक्षक माहेश्वर रेड्डी ठाण मांडून– पोलिस अधीक्षक यांनी सांगितले की सदर फरार आरोपीचां शोध घेण्या कामी विशेष पोलिस पथक नेमण्यात आले असुन तात्काळ आरोपींचा शोध घेऊन आरोपी अटक करण्यात येईल अशी माहिती स्थानिक पत्रकारांना दिली आहे.

घटनेमागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र,पोलिस विविध शक्यतांचा विचार करून सर्व अंगांनी तपास करत आहेत. या थरारक हत्येने शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!