श्री क्षेञ मांडकी बाळु मामा देवस्थानावर बाळु मामाच्या भुमिकेतील अभिनेते सुमित पुसाळे यांची सपत्नीक भेट.!!!
श्री क्षेञ मांडकी बाळु मामा देवस्थानावर बाळु मामाच्या भुमिकेतील अभिनेते सुमित पुसाळे यांची सपत्नीक भेट.!!!
भडगाव प्रतिनिधी :—
श्री संत सदगुरु बाळुमामा देवस्थान श्री क्षेत्र मांडकी तालुका भडगाव जिल्हा जळगाव येथे दि. २१ रोजी अमावस्या निमित्त संध्याकाळी ६ वाजता बाळुमामा च्या नावानं चांगभलं मालिकेतील बाळुमामा भुमिकेतील अभिनेते सुमित पुसावळे यांनी आपल्या धर्म पत्नी सह मंदिराला भेट दिली. त्यांचे फटाके च्या अतिश बाजित स्वागत करण्यात आले. व बाळुमामा च्या नावानं चांगभलं नावाने जय घोष करण्यात आला.
त्यानंतर सुभाष चौधरी यांच्या घरी बाळुमामा भुमिकेतील अभिनेते सुमित पुसावळे यांचे औक्षण करण्यात आले. त्यानंतर पाय घड्या वरून फुलांचा वर्षाव करत सुमित पुसावळे यांचे स्वागत करून मंदिरात बाळुमामा चे दर्शन घेतले. नंतर बाळुमामा मंदिर व त्यांच्या कार्या विषयी सुभाष चौधरी यांनी प्रास्ताविकातुन माहिती दिली. नंतर बाळुमामा च्या भुमिकेतील अभिनेते सुमित पुसावळे यांचेसह त्यांच्या धर्म पत्नी यांचे स्वागत मंदिराचे पुजारी सुभाष चौधरी व पत्नी सुवर्णा चौधरी यांनी बाळुमामा चे घोंगडे व काठी तसेच मंदिराची प्रतिमा देऊन स्वागत करण्यात आले. नंतर अभिनेते सुमित पुसावळे यांनी आपले सर्व जीवन पट सर्वांच्या समोर मांडला. व बाळुमामा मुळेच माझे सर्व जीवन आनंदीत झाले आहे. तसेच घरोघरी मातीच्या चुली , व लागिर झाल जी या मालिकेत देखील भुमिका आहे. सुमित पुसावळे बाळूमामा च्या नावानं चांगभलं मालिकेतील बाळुमामा चे मुखाचे वाक्य जसेच्या तसे म्हणुन दाखविले. मनोगत झाल्यानंतर सुमित पुसावळे व धर्म पत्नी यांच्या हस्ते बाळुमामा ची आरती करण्यात आली. आरती झाल्या नंतर फोटो सेशन झाले गावाने व भाविकांनी प्रत्यक्ष बाळुमामा चे दर्शन घेतले. मी अमावस्या ला आदमापूर ला आलो आहे. असेच वाटत आहे. पुनश्च क्षेत्र मांडकी या मंदिराला भेट देईन. गावात अतिशय आनंदाचे वातावरण होते.सुत्रसंचलन भडगाव येथील प्रवीण महाजन यांनी केले.