जय बाबाजी भक्त परिवार जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख पदी यशवंत मोरे यांची निवड
आमीन पिंजारी भडगाव ता प्रतिनिधी :-
कजगाव तालुका भडगाव जय बाबाजी भक्त परिवार जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख पदी यशवंत मोरे उर्फ बापू मोरे यांची नियुक्ती करण्यात आली, जय बाबाजी भक्त परिवार यांची तालुकास्तरावर भडगाव माऊली हॉस्पिटल येथे झालेल्या बैठकीत जय बाबाजी भक्त परिवार जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख पदी बापू मोरे यांची निवड करण्यात आली यावेळी जळगाव जिल्हा सेवक डॉक्टर गणेश अहिरे ,संजय मराठे, अरुण थोरात, तालुका सेवक समाधान पाटील, यांच्या सर्वांच्या उपस्थितीत निवड झाल्याने यशवंत उत्तम मोरे उर्फ बापू मोरे यांच्या जय बाबाजी भक्त परिवार यांच्याकडून व गावातील नागरिकांकडून नातेवाईक मित्र परिवाराकडून पुढील वाटचालीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.