अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात : कृष्णा फाउंडेशन व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ₹१,११,१११ चा धनादेश सुपूर्द.!!!
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात : कृष्णा फाउंडेशन व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ₹१,११,१११ चा धनादेश सुपूर्द.!!!
राज्यातील अनेक भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या संकटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सामाजिक बांधिलकी जोपासत भडगाव तालुक्याचे माजी राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष हर्षल पाटील यांनी त्यांच्या कृष्णा फाउंडेशनच्या वतीने तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ₹१,११,१११ (एक लाख अकरा हजार एकशे अकरा) रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.
हा धनादेश राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते ना. अजितदादा पवार यांच्या हस्ते मुंबई येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्यस्तरीय आढावा बैठकीदरम्यान देण्यात आला.
या वेळी कार्यक्रमास राज्याचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी मंत्री आणि आमदार अनिलदादा पाटील, जळगाव जिल्हाध्यक्ष संजय भाऊसाहेब पवार, जिल्हा कार्याध्यक्ष योगेश दादा देसले, महानगराध्यक्ष अभिषेक पाटील तसेच युवक जिल्हाध्यक्ष विकी पाटील उपस्थित होते.
हर्षल पाटील यांनी या प्रसंगी सांगितले की, “अतिवृष्टी आणि पूरामुळे अनेक शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. अशा वेळी समाजातील प्रत्येक जबाबदार व्यक्तीने शक्य ती मदत करणे ही आपली जबाबदारी आहे. शेतकरी हा आपल्या देशाचा कणा आहे, आणि त्याच्या पाठीशी उभे राहणे हे आपले कर्तव्य आहे,” असे ते म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनीही या उपक्रमाचे कौतुक करताना म्हटले की, “अशा प्रकारच्या सामाजिक पुढाकारामुळे शासनाला मदत मिळते आणि शेतकऱ्यांमध्ये विश्वास निर्माण होतो. हर्षल पाटील आणि कृष्णा फाउंडेशनचे हे योगदान प्रेरणादायी आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
या मदत उपक्रमामुळे भडगाव आणि जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, युवक कार्यकर्त्यांमध्ये सामाजिक कार्याची प्रेरणा निर्माण झाली आहे.