भडगाव तालुक्यातील पत्रकार बांधवांना दिवाळी स्नेहभेट : पी.टी.सी. चेअरमन नानासाहेब संजय वाघ यांच्या हस्ते वितरण.!!!
भडगाव तालुक्यातील पत्रकार बांधवांना दिवाळी स्नेहभेट : पी.टी.सी. चेअरमन नानासाहेब संजय वाघ यांच्या हस्ते वितरण.!!!
भडगाव प्रतिनिधी :—
दिवाळी या प्रकाशोत्सवाच्या निमित्ताने भडगाव तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांना स्नेहभेट देण्यात आली. हा कार्यक्रम पी.टी.सी. चेअरमन मा. श्री. नानासाहेब संजय वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
या प्रसंगी भाजपा मा ता अध्यक्ष सोमनाथ पाटील, जिल्हा सरचिटणीस मा नगरसेवक अमोल नाना पाटील, डी.डी. पाटील सर, मा. नगरसेविका योजना ताई पाटील रजनीताई नानासाहेब देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य गायकवाड सर, देशमुख सर, तसेच विविध शैक्षणिक संस्था व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले होते. पत्रकार बांधवांच्या सेवाभावाचे आणि समाजप्रबोधनातील त्यांच्या योगदानाचे कौतुक करताना नानासाहेब वाघ म्हणाले की, “पत्रकार समाजाचे आरसे आहेत. त्यांच्या माध्यमातून समाजातील चांगल्या गोष्टींचा प्रसार आणि समस्यांचे निराकरण होऊ शकते. पत्रकार हे लोकशाहीचे चौथे स्तंभ असून त्यांचा सन्मान राखणे ही आपली जबाबदारी आहे.”
या कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांनी पत्रकारांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि स्नेहभेट वाटप करून मैत्री व एकोप्याचा संदेश दिला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डी.डी. पाटील सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन गायकवाड सर यांनी मानले.
कार्यक्रमास विविध वृत्तसंस्थांचे संपादक, प्रतिनिधी, शिक्षक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर सर्वांनी एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देत स्नेहपूर्वक संवाद साधला.