हृदय आरोग्याचा नवा मापदंड – तंत्रज्ञान आणि सेवा दोन्हींचा संगम.सर एच.एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलचा प्रगत दृष्टीकोन
भारत आणि दक्षिण आशियात प्रथमच ‘नेओटोम अल्फा फोटॉन काउंटिंग सीटी स्कॅनर’चे लोकार्पण
हृदय आरोग्याचा नवा मापदंड – तंत्रज्ञान आणि सेवा दोन्हींचा संगम.सर एच.एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलचा प्रगत दृष्टीकोन
भारत आणि दक्षिण आशियात प्रथमच ‘नेओटोम अल्फा फोटॉन काउंटिंग सीटी स्कॅनर’चे लोकार्पण
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : वर्ल्ड हार्ट डेच्या निमित्ताने सर एच.एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलने हृदय आरोग्य संवर्धनासाठी एक ऐतिहासिक आणि परिवर्तनकारी पाऊल उचलले आहे. वाढत्या हृदयविकारांच्या पार्श्वभूमीवर हॉस्पिटलने नागरिक सक्षमीकरण, अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी विशेष उपक्रम अशा तीन स्तरांवर आरोग्य संवर्धनाचा व्यापक आराखडा सादर केला आहे.
या मोहिमेचा केंद्रबिंदू ठरला तो ‘नेओटोम अल्फा फोटॉन काउंटिंग सीटी स्कॅनर’ चा शुभारंभ — भारत आणि दक्षिण आशियातील पहिला असा स्कॅनर. हे अत्याधुनिक तंत्रज्ञान पारंपरिक कोरोनरी अँजिओग्राफीला एक सुरक्षित आणि अचूक पर्याय ठरते. यात ३० ते ५० टक्के कमी किरणोत्सर्गासह उच्च दर्जाच्या रेझोल्यूशन प्रतिमा मिळतात, ज्यामुळे सूक्ष्म अडथळे, स्टेंट तपासणीतील मर्यादा आणि कॅल्सिफाइड प्लॅक्स यांचा अचूक मागोवा घेता येतो. निदानाच्या या नव्या पद्धतीने हृदय तपासणीतील सुरक्षितता आणि विश्वासार्हतेचे नवे मानदंड प्रस्थापित केले आहेत.
या नव्या टप्प्याबाबत बोलताना, डॉ. तरंग गिआनचंदानी, ग्रुप सीईओ – हेल्थकेअर इनिशिएटिव्ह्ज व सीईओ – सर एच.एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल, म्हणाल्या, “हृदयविकारासंदर्भात फक्त जनजागृती पुरेशी नाही; लोकांना त्या दिशेने पावले उचलण्यासाठी प्रेरित करणं गरजेचं आहे. फोटॉन काउंटिंग सीटी स्कॅनरचा शुभारंभ ही आमच्या दूरदृष्टीची साक्ष आहे – जी नवतंत्रज्ञान आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवांचा समन्वय साधते. यासोबतच आमचे मोफत सीपीआर प्रशिक्षण शिबिर आणि ‘केअर फॉर द केअरगिव्हर’ उपक्रम हे आम्ही समुदाय आरोग्याकडे समग्र दृष्टीकोनातून पाहतो याचे उत्तम उदाहरण आहे.”
हॉस्पिटलने नागरिकांसाठी मोफत सीपीआर प्रशिक्षण शिबिर आयोजित करून जीवन वाचवण्याचे प्रत्यक्ष कौशल्य प्रसारित करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. आतापर्यंत ५०० हून अधिक कर्मचारी, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि रिलायन्सचे कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले असून हे प्रशिक्षित नागरिक “फर्स्ट रिस्पॉन्डर” म्हणून सज्ज झाले आहेत. भारतात दररोज हजारो लोकांचा मृत्यू अचानक कार्डिअॅक अरेस्टमुळे होतो, अशा परिस्थितीत हा उपक्रम जीवनरक्षक ठरत आहे.
तसेच, ‘केअर फॉर द केअरगिव्हर’ या मोहिमेद्वारे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी १०० हून अधिक मोफत हृदय आरोग्य तपासणी सत्र आयोजित करण्यात आली आहेत. आरोग्यसेवा देणाऱ्यांचे स्वतःचे आरोग्य सुरक्षित ठेवणे ही देखील तितकीच महत्त्वाची जबाबदारी आहे, हे हॉस्पिटलने या उपक्रमातून अधोरेखित केले आहे.
या सर्व मोहिमांना ‘ओन द टफ कॉल’ या प्रचार अभियानाद्वारे जनसामान्यांपर्यंत पोहोचवले जात आहे. लघुचित्रफितींमार्फत पोषणमूल्यपूर्ण आहार, दररोजचा व्यायाम आणि नियमित तपासणी यांसारख्या लहान पण निर्णायक कृती आरोग्यसंपन्न आयुष्याची गुरुकिल्ली ठरू शकतात, हा संदेश दिला जात आहे.
या सर्व उपक्रमांच्या माध्यमातून सर एच.एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलने एकविसाव्या शतकातील हृदय आरोग्याची नवी व्याख्या साकारली आहे — ज्यामध्ये तंत्रज्ञान, समुदाय सहभाग आणि केअरगिव्हर्सच्या काळजीचा समतोल साधत निरोगी, सक्षम आणि सजग समाज घडवण्याचा संकल्प दृढ करण्यात आला आहे.