बालमिञ भावांनी बहिणींना दिला साडी, चोळीचा आहेर. वाडे येथे दहावीच्या माजी विदयार्थ्यांचे रंगले स्नेह संमेलन. ४३ वर्षानंतर भरली बाल मिञांची शाळा. आठवणींना मिळाला उजाळा.!!!
गुरुजनांचा केला सन्मान. राजकारणासह विविध क्षेञात विदयार्थी अग्रेसर.
बालमिञ भावांनी बहिणींना दिला साडी, चोळीचा आहेर.
वाडे येथे दहावीच्या माजी विदयार्थ्यांचे रंगले स्नेह संमेलन. ४३ वर्षानंतर भरली बाल मिञांची शाळा. आठवणींना मिळाला उजाळा.
गुरुजनांचा केला सन्मान. राजकारणासह विविध क्षेञात विदयार्थी अग्रेसर.
भडगाव प्रतिनिधी :-
तालुक्यातील वाडे येथील सन १९८२ , १९८३ या वर्षाच्या इयत्ता दहावीच्या वर्गाच्या बॅचचे स्नेह संमेलनाचा कार्यक्रम नुकताच वाडे येथुन जवळच असलेल्या तिर्थश्रेञ ऋषीपांथा देवस्थानावर निसर्गाच्या रम्य परीसरात आयोजीत करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक एस एम पाटील हे होते. यावेळी माजी विदयार्थ्यांनी गुरुजनांचा सत्कार व सन्मान केला. तर बालमिञ विदयार्थ्यांनी भावांनी बहिणींना साडी, चोळीचा जणु आहेर दिला आहे. असा हा आगळा वेगळा स्नेह संमेलनचा कार्यक्रम निसर्गाच्या सानिध्यात आणि गुरुजनांच्या उपस्थित खुपच रंगल्याचे दिसुन आले. विदर्थ्याकार्यक्रम या कार्यक्रमात विदयार्थी मिञ, मैञिणींचा परीचय होत शाळेतील बालपणीच्या आठवणींना उजाळा मिळाला. आणि तब्बल ४३ वर्षानंतर बालमिञ व मैञिणी एकञ आल्याचा आनंद काही औरच दिसुन आला. या कार्यक्रमात जवळपास विदयार्थी, विदयार्थीनींचा सहभाग होता. या कार्यक्रमानिमित्त शिक्षकांच्या उपस्थितीत ही बालमिञांची जणु शाळाच भरल्याचे आनंददायी चिञ दिसुन आले.
कार्यक्रमाच्या प्रास्तविकातुन राजेंद्र सहादु महाजन यांनी शालेय जिवनातील अनुभव मांडला. तसेच राञीच्या वेळेस आम्हाला शाळेतच अभ्यासाला सोय करुन दिलेली होती. आम्हाला शिक्षकांनी अभ्यासातुन घडविले म्हणुन आज आम्ही विविध क्षेञात कार्य करीत आहोत. आज गुरुजनांसमोर आपण अनेक वर्षानंतर या स्नेह संमेलन कार्यक्रमानिमित्त एकञ आलो आणि सर्व बालमिञांच्या आठवणींना उजाळा मिळाला असल्याचेही शेवटी राजेंद्र महाजन यांनी सांगीतले.
यावेळी व्यासपिठावर सेवानिवृत्त मुख्याध्यापक एस एम पाटील, सेवानिवृत्त प्राचार्य एस एस पाटील, एस आर माळी, ओंकारदास बैरागी, शिवाजी पाटील , पञकार अशोक परदेशी, मी वाडेकर गृपचे जगदिश राजपुत आदि गुरुजन वर्गाची प्रमुख उपस्थिती लाभली होती. या कार्यक्रमाचे सुञसंचलन यांनी केले. सुरुवातीस दिपप्रज्वलन व सरस्वती मातेचे पुजन व माल्यार्पण मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. त्यानंतर शालेय शिक्षण घेतलेल्या बालमिञ विदयार्थी व विदयार्थीनी अशा एकुण ८ मयत झालेल्या व्यक्तींना भावपुर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच त्यानंतर विदयार्थ्यांनी आपल्या गुरुजनांचा व उपस्थित पाहुणे मंडळींचा पुष्पहार, टोपी, शाल देउन सत्कारही करण्यात आला. वर्गातील विदयार्थी मैञिणींना विदयार्थी भावांकडुन साडी, चोळीचा आहेर देण्यात आला.
तसेच दयाराम महाजन, व्हि. एस. पाटील यांनी कबके बिछडे हुए हम आज आके मिले असे आनंदाने म्हणाच हास्य पिकले.
दशरथ महाजन यांनी मनोगतातुन सर्व बालमिञ आज एकञ आलो अन बालमिञांच्या आठवणींना उजाळा मिळाला, गुरुजनांचे आम्हाला दर्शन याचा आम्हाला आनंद असल्याचे सांगीतले.
यांचेसह इतर विदयार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर शिक्षक एस आर माळी यांनी मनोगतातुन सांगीतले कि, तुम्ही व्यसन करु नका, आरोग्य जपा, नित्याने व्यायाम करा. असेही विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले.
नंतर रेखाबाई पाटील यांनी मनोगतातुन शालेय जिवनातला सर्व काळ चांगला होता. कोरोनातुन आपण सर्वजण वाचलो. आपण सर्वजण भेटत राहा बोलतांना डोळयातुन अश्रु तरारल्याचे दिसुन आले.
तसेच जनाबाई पाटील,
गिताबाई परदेशी , नलीनीबाई पाटील, रेखाबाई पाटील, लताबाई माळी, नलुबाई पाटील आदि विदयार्थी, विदयार्थीनींनी आपले मनोगत व्यक्त केले.
त्यानंतर बालपणाचे विदयार्थी, विदयार्थींनी आपआपला परीचय करुन दिला.बालपणीच्या आठवणींना उजाळा देत परीचय करुन देतांना हास्याचे एकच फवारे उडाल्याचे दिसुन आले. अन टाळयांचा कडकडाट झाला.
माजी प्राचार्य एस एस पाटील यांनी मनोगतातुन सांगीतले कि, आपल्या शाळेच्या गृपचे नाव आहे हर हर महादेव गृप आणि याच नावाच्या आज ॠषीपांथा तिर्थक्षेञावर पविञ देवस्थानावर या दहावीच्या बॅचच्या स्नेह संमेलनाचे चांगले आयोजन केले. आपले लाडकेभाऊ आपल्या लाडक्या बहिणींना विसरलेले नाहीत. भावांनी बहीणींना आज या कार्यक्रमानिमित्ताने साडी, चोळीचा आहेर देऊन शाळेतील बालमिञ बहिण भावांच्या या अनोख्या कार्यक्रमाने बहिण भावांचे पविञ नाते जपल्याचा आनंद आहे. असेही एस एस पाटील यांनी मांडले. तसेच
तुम्ही बालपणी अभ्यासाचे जे धडे घेतले त्यामुळेच आज आपण विविध क्षेञात यश मिळवुन प्रगती केलेली आहे. असे सांगत विदयार्थ्यांना भावी वाटचालीस शुभेच्याही एस एस पाटील यांनी मनोगतातुन दिल्या.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त मुख्याध्यापक एस एम पाटील यांनी मनोगतातुन सांगीतले कि, आम्ही चांगले विदयार्थी घडविले. मुलांना चांगले संस्कार मिळाले. विदयार्थ्यांना संस्कारक्षम बनविले. माझे जीवन सत्कारणी लागले. आज गुरुंना मोठे महत्व आहे. शिक्षकी पेशा पविञ पेशा आहे. आपण दुसर्याच्या मदतीसाठी झटा. मदत करा असा संदेशही विदयार्थ्यांना एस एम पाटील यांनी बोलतांना दिला. या कार्यक्रमाचे सुञसंचलन नारायण बारकु पाटील यांनी केले. त्यांनी शाळा शिकतांना आम्ही विदयार्थ्यांचे व गुरुजनांनी ज्ञानार्जन करतांना ज्या चुका आढळल्या त्याबाबत त्यावेळी अनमोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे आयोजन दहावीचे माजी विदयार्थी विलास परदेशी, शिवसिंग परदेशी, शांताराम माळी, राजेंद्र परदेशी या मिञ परीवारांनी केले होते. या आयोजकांचे तिघांचे सत्कार सेवानिवृत्त मुख्याध्यापक एस एम पाटील यांचे हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या आयोजकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
तसेच गावाचा २०२६ मधील किर्तन सप्ताहात नारळ उचलला आहे महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजीत केला आहे.याबाबत चर्चा करण्याचे ठरलेले आहे. कार्यक्रमास दहावीच्या माजी विदयार्थ्यांसह परीवारातील सदस्यही मोठया संख्येने हजर होते. कार्यक्रम यशस्विततेसाठी दहावीच्या सर्व विदयार्थी, विदयार्थीनींनी अनमोल परीश्रम घेतले.उपस्थितांचे आभार विठ्ठल महाजन यांनी मानले.