कनाशी विकासोच्या चेअरमन पदि नाना सरदार तर व्हाईस चेअरमन पदि मायाबाई पाटील बिनविरोध.!!!
भडगाव प्रतिनिधी :-
नुतन कनाशी विविध कार्यकारी सोसायटी च्या चेअरमन पदी नाना कौतिक सरदार तर व्हाईस चेअरमन पदी मायाबाई आधार पाटील यांची दोघा पदाधिकार्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. याप्रसंगी रंजनाबाई भालचंद्र पाटील ,संजय दिनकर पाटील,इंदुबाई बळीराम पाटील,रमेश महारू पाटील,डॉ.अमृत विनायक पाटील,दिपक बळीराम पाटील,विजय श्रावण पाटील, पांडुरंग निंबा पाटील, संजय सांडु पाटील,कल्पना विश्वास पाटील, रवींद्र रुस्तम पुजारी सर्व संचालक मंडळ,
पदाधिकारी, नागरीक उपस्थित होते. तसेच निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन जितेंद्र जोशी तसेच प्रेमसिंग पाटील यांनी कामकाज पाहीले. तसेच संस्थेचे सचिव संजीव पाटील यांनी याकामी सहकार्य केले. यावेळी चेअरमन नाना सरदार व व्हाईस चेअरमन पदि मायाबाई पाटील या दोघा नवनिर्वाचीत पदाधिकार्यांचा संचालक मंडळा मार्फत सत्कार करण्यात आला. या दोघा नवनिवार्चीत पदाधिकार्यांचे भडगावचे पञकार अशोकबापु परदेशी, वाडे ग्रामपंचायतीच्या माजी उपसरपंच ऊषाबाई परदेशी यांनीही अभिनंदन केले आहे.