पिंपरखेड येथे आरोग्य विभागामार्फत पाण्याच्या टाक्या रिकाम्या केल्या.!!!

0 58

पिंपरखेड येथे आरोग्य विभागामार्फत पाण्याच्या टाक्या रिकाम्या केल्या.!!!

भडगाव प्रतिनिधी:-

भडगाव-पावसाळा संपला असला तरी दिवाळी सारख्या सणामध्ये किटकजन्य आजार आपली डोकी वर काढण्याची शक्यता नाकारता येत नाही.कारण दिवाळीमध्ये नागरिकांचे स्थलांतर होते.दिवाळीमध्ये नागरिक आपल्या गावी सण साजरा करण्यासाठी येतात.अशावेळी किटकजन्य आजार होऊ नये म्हणून नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे.अशी सूचना आरोग्य विभागामार्फत पिंपरखेड येथे देण्यात आल्या. त्याचाच एक भाग म्हणून पिंपरखेड येथे किटकजन्य आजारांविषयी जनजागृती करण्यात येऊन किटकजन्य म्हणजे हिवताप,डेंग्यू व चिकनगुनिया आजारांच्या डासांच्या अंडी असलेल्या पाण्याच्या टाक्या रिकाम्या करण्यात आल्या.सदर प्रसंगी पिंपरखेड येथील आरोग्य निरीक्षक संजय सोनार कळवाडीकर व पिंपरखेड येथील आरोग्य सेवक राजेंद्र पवार हे उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!