महिंदळे येथील भुमिपुञ श्री. सुदाम परदेशी साहेब यांची नाशिक येथे अप्पर जिल्हाधिकारी पदी नियुक्ती.!!!
परदेशी समाजामार्फत सत्कार अन मिञ परीवारा मार्फतही शुभेच्छांचा वर्षाव.
महिंदळे येथील भुमिपुञ श्री. सुदाम परदेशी साहेब यांची नाशिक येथे अप्पर जिल्हाधिकारी पदी नियुक्ती.!!!
परदेशी समाजामार्फत सत्कार अन मिञ परीवारा मार्फतही शुभेच्छांचा वर्षाव.
भडगाव प्रतिनिधी :—
तालुक्यातील महिंदळे येथील भुमिपुञ व जनमानसात लोकप्रियता अन हसतमुख चेहरा अन सर्वांशी प्रेम, आपुलकी अन जिव्हाळयाचे अतुट नाते जपणारे आदरणीय श्री. सुदाम अमरसिंग परदेशी साहेब यांची नुकतीच नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी या पदावर पदोन्नतीने नियुक्ती शासनामार्फत करण्यात आलेली आहे.
ते यापुर्वी अंधेरी मुंबई येथे मुद्रांक जिल्हाधिकारी या पदावर कार्यरत होते. त्यांची अंधेरी मुंबई येथुन नाशिक येथे विभागीय आयुक्त कार्यालयात पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आलेली आहे. ते नाशिक येथे लवकरच रुजु होऊन पदाचा चार्ज घेणार आहेत. त्यांनी आतापर्यंत एकुण २० वर्ष चांगली सेवा बजावली असुन त्यांचा शिस्तप्रिय अन जनतेला न्याय देण्याची भुमिका आहे. त्यांचा प्रशासनात अन शासन दरबारी चांगले अधिकारी म्हणुन कामकाज बजावल्याचा ठसा साहेबांनी उमटविलेला आहे. त्यांनी यापुर्वी कराड जिल्हा सातारा, जुन्नर पुणे, ठाणे पनवेल, अंधेरी मुंबई येथे चांगली सेवा बजावलेली आहे.
त्यांच्या नियुक्तीबद्धल भडगाव तालुक्यासह पाचोरा, चाळीसगाव, कन्नड तालुका यासह जळगाव जिल्हा, औरंगाबाद जिल्हा यासह सर्वञ अभिनंदनाचा वर्षाव परदेशी, मिणा, राजपुत समाजासह मिञ परीवारातुन होत आहे. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचा भडगाव येथे निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे वलवाडी शेत शिवारातील फार्म हाऊसवर निसर्गरम्य हिरवळीच्या वातावरणात जळगाव जिल्हा परदेशी,मिणा, राजपुत समाज व मिञ परीवारा मार्फत पुष्पगुच्छ , शाल देऊन मनपुर्वक सत्कार करण्यात आला.
यावेळी भडगावचे माजी नगराध्यक्ष आदरणीय श्री. गणेश आण्णा परदेशी, परदेशी, मिणा, राजपुत समाजाचे जिल्हाध्यक्ष श्री. सुरेशभाऊ कोंडु परदेशी, समाजाचे तंटामुक्ती जळगाव जिल्हा अध्यक्ष विनोदभाऊ परदेशी, समाजाचे तालुका अध्यक्ष अशोकबाप्पु परदेशी, समाजाचे चाळीसगाव तालुका अध्यक्ष व जावई बापु श्री. भगवान परदेशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सेवानिवृत्त अभियंता श्री. प्रकाश परदेशी साहेब, चाळीसगाव परदेशी राजपुत उन्नती समाज मंडळाचे माजी सदस्य आदरणीय श्री. सुरेशभाऊ परदेशी, श्री. आकाश परदेशी यांचेसह समाजबांधव व मिञ परीवार उपस्थित होते.