ब्रेकिंग: उद्यापासून HSRP नंबर प्लेट नसल्यास थेट ₹5,000 दंड.!!!
आपल्या वाहनावर अजूनही हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवलेली नसेल, तर आता सावधान! 15 ऑगस्ट 2025 ही अंतिम तारीख ठरवण्यात आली असून, 16 ऑगस्टपासून परिवहन विभाग व पोलिस भरारी पथके रस्त्यावर उतरून थेट कारवाई सुरू करणार आहेत. पहिल्याच गुन्ह्यासाठी ₹5,000 तर पुनरावृत्ती झाल्यास तब्बल ₹10,000 दंड आकारला जाणार आहे.
वाहन चोरी व फसवणूक रोखण्यासाठी केंद्र सरकारने या प्लेट्स अनिवार्य केल्या आहेत. या प्लेटवर लेझर-कोरलेला कोड, क्रोमियम-आधारित होलोग्राम आणि स्नॅप-लॉक यंत्रणा असते, ज्यामुळे त्याची बनावट किंवा छेडछाड करणे जवळजवळ अशक्य होते. यामुळे वाहनांची सुरक्षा वाढते आणि चोरी झालेल्या वाहनांचा शोध घेणे अधिक सोपे होते.
गेल्या काही महिन्यांत सरकारने अंतिम तारीख तीन वेळा वाढवली होती – 30 एप्रिल, नंतर 30 जून, आणि अखेर 15 ऑगस्ट निश्चित करण्यात आली. मात्र, यावेळी मुदतवाढ होण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे विलंब न करता अधिकृत वेबसाइटवरून आजच नोंदणी करून HSRP नंबर प्लेट बसवणे आवश्यक आहे.