कजगांव वाडे गटातून जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शिंदे गटाची जोरदार तयारी — शोभाताई विश्वास पाटील यांच्या उमेदवारीला वेग.!!!
कजगांव वाडे गटातून जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शिंदे गटाची जोरदार तयारी — शोभाताई विश्वास पाटील यांच्या उमेदवारीला वेग.!!!भडगाव प्रतिनिधी :-
कजगांव वाडे गटातून होणाऱ्या आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शिंदे गटाकडून सौ. शोभाताई विश्वास पाटील यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा सुरू असून, त्यांच्या उमेदवारीसाठी कार्यकर्त्यांनी तयारीचा धडाका सुरू केला आहे.
स्थानिक पातळीवर समाजकारण, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण विकास क्षेत्रात सक्रिय असलेल्या सौ. शोभाताई विश्वास पाटील या ग्रामस्थांमध्ये लोकप्रिय आहेत. त्यांच्या पती विश्वास पाटील हे आमदार किशोर आप्पा पाटील यांचे खंदे समर्थक व विश्वासू कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यामुळे कजगांव वाडे गटात शिंदे गटाचा पाया अधिक भक्कम होत असल्याचे स्थानिक कार्यकर्त्यांचे मत आहे.
सौ. शोभाताई पाटील यांनी गेल्या काही वर्षांत महिलांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबवले असून, अनेक ग्रामपातळीवरील समस्यांबाबत त्यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या स्नेही स्वभावामुळे आणि कार्यतत्परतेमुळे त्या महिला मतदारांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत.
शिंदे गटाच्या कार्यकर्त्यां कडून ही त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा मिळत असून,गटात नव्या उर्जेचा संचार झाल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.स्थानिक स्तरावर बैठका,सल्लामसलती आणि प्रचाराच्या तयारीचे कार्यक्रम सुरू झाले आहेत. अनेक गावांत कार्यकर्त्यांनी घराघरांत जाऊन जनसंपर्क मोहीम सुरू केली आहे.
या उमेदवारीमुळे कजगांव वाडे गटातील राजकीय समीकरणांमध्ये चैतन्य निर्माण झाले असून, निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.