जळगावसामाजिक

महापुरुषांच्या अपमानाचा प्रकार; रिपब्लिकन सेना आक्रमक.!!!

आरोपीवर मोक्का अंतर्गत कारवाईची मागणी, अन्यथा जेल भरो आंदोलनाचा इशारा

महापुरुषांच्या अपमानाचा प्रकार; रिपब्लिकन सेना आक्रमक

आरोपीवर मोक्का अंतर्गत कारवाईची मागणी, अन्यथा जेल भरो आंदोलनाचा इशारा

भुसावळ  प्रतिनिधी

सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून महापुरुषांची बदनामी, अपमान तसेच समाजात जातीय व धार्मिक तेढ निर्माण करणारे संदेश व व्हिडिओ प्रसारित होण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. अशाच एका गंभीर प्रकरणात फेसबुक लाईव्हद्वारे महापुरुषांचा अपमान, महिलांविषयी अत्यंत अश्लील वक्तव्ये तसेच समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार भूषण भास्कर पाटील नामक व्यक्तीने केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या घटनेविरोधात रिपब्लिकन सेना आक्रमक झाली असून संबंधित आरोपीवर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४०/२०२६ दाखल करण्यात आला आहे.

रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी पाचपेक्षा अधिक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. अशा विकृत आणि समाजविघातक प्रवृत्तीच्या व्यक्तीमुळे समाजातील शांतता व कायदा-सुव्यवस्थेला धोका निर्माण होत असल्याने त्याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. तसेच सदर आरोपीला तात्काळ जिल्ह्यातून तडीपार करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

या संदर्भात रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांनी पोलीस प्रशासनाला निवेदन सादर करत, आरोपीवर कठोर कारवाई न झाल्यास संपूर्ण जिल्ह्यात जेल भरो आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही दिला आहे. समाजात तेढ निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींना कोणत्याही परिस्थितीत थारा दिला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

निवेदन देताना रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, जिल्हा नेते दिनेश इखारे, महिला सेना जिल्हाध्यक्षा वंदना सोनवणे, जिल्हा महासचिव वंदना आराक, जिल्हा उपाध्यक्ष देवदत्त मकासरे, राजश्री सोनवणे तसेच बंटी नरवाडे उपस्थित होते. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी एकमुखाने आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!