जळगावमहाराष्ट्रसामाजिक

निकृष्ट कामांवर महिंदळे येथील ग्रामस्थांचा संताप; भडगांव तहसील कार्यालया समोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण संपन्न.!!!

निकृष्ट कामांवर महिंदळे येथील ग्रामस्थांचा संताप; भडगांव तहसील कार्यालया समोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण संपन्न.!!!

भडगाव प्रतिनिधी :–

तालुक्यातील मौजे महिंदळे गावात जल जीवन मिशन अंतर्गत झालेल्या कथित निकृष्ट दर्जाच्या पाणीपुरवठा कामाबाबत ग्रामस्थांचा संताप उफाळून आला असून, प्रशासनाच्या उदासीन भूमिकेविरोधात १३ फेब्रुवारी २०२६ रोजी तहसील कार्यालय, भडगाव येथे महिंदळे येथील ग्रामस्थांनी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण छेडण्यात आले यावेळी भडगांव गटविकास अधिकारी के.बी.अंजने यांनी उपोषण स्थळी भेट देत सदर कामाची चौकशी करून कारवाईचे आश्वासन दिले तसेच कार्यकारी अभियंता ग्रामीण पुरवठा विभाग जिल्हा परिषद जळगांव या कार्यालयाचे लेखी पत्र

सहाय्यक अभियंता मनोज देवरे यांनी देत दि. २६ रोजी चौकशी करून कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले त्यांनंतर उपोषणाची सांगता करण्यात आली

 

याबाबत सविस्तर माहिती अशी की

सन २०२२-२३ मध्ये जल जीवन मिशन योजनेअंतर्गत गावात पाईपलाईन टाकण्याचे काम करण्यात आले. मात्र कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही गावात आजतागायत सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. निकृष्ट दर्जाचे काम करून शासनाच्या निधीची उधळपट्टी झाल्याचा आरोप करत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

 

दरम्यान, महिंदळे बसस्टॉप येथे बसविण्यात आलेली बंद स्वरूपाची अॅक्वा यंत्रणा स्थापनेपासून आजपर्यंत सुरूच झालेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांना उन्हात, पावसात रस्त्यावर उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागत आहे. “लोकांच्या पैशातून उभारलेली सुविधा केवळ शोभेची वस्तू ठरली आहे,” अशी तीव्र प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली.

 

याशिवाय शासनमान्य शेत पाणंद रस्त्यांची कामे प्रत्यक्षात झालेली नसल्याने शेतकऱ्यांना शेतीमाल वाहतुकीस मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मंजूर निधी कुठे गेला? कामे कागदावरच दाखवली का? असे सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केले आहेत.

 

ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी, भडगाव तहसीलदार भडगाव जिल्हा परिषद जळगावचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे वारंवार लेखी तक्रारी दिल्याचा दावा केला आहे. मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थांनी अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.

 

सदर कामांची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, निकृष्ट कामाचा खर्च वसूल करावा आणि अपूर्ण कामे तात्काळ पूर्ण करावीत,अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थांनी यावेळी दिला आहे.

यावेळी महिंदळे ग्रामस्थ

भास्कर पाटील,सुनील पाटील,देविदास पाटील, उत्तम पाटील, पुर्थीराज पाटील, राजेंद्र पाटील, साहेबराव पाटील, सुधाकर पाटील, पितांबर पाटील,भिकन पाटील, कैलास पाटील,रघुनाथ पाटील,रावसाहेब पाटील, दिलीप पाटील,प्रताप पाटील, उपोषणाला बसले होते.

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!