
सौ. रजनीताई देशमुख महाविद्यालयात वाणिज्य विभागाच्या भित्तीपत्रकांचे प्रकाशन.!!!
भडगाव प्रतिनिधी :-
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात वाणिज्य विभागाच्या वतीने विविध विषयांवरील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भित्तीपत्रकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. ‘डिजिटल पेमेंट सिस्टीम प्रकार’ या विषयावर श्रद्धा अनिल पाटील (प्रथम वर्ष वाणिज्य), ‘भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा’ या विषयावर भावेश्वरी जिजाबराव पाटील व कृष्णप्रिया दिनकर पाटील (द्वितीय वर्ष वाणिज्य) तर ‘ई-कॉमर्स बिझनेसचे भविष्य’ या विषयावर हर्षाली मनोज पाटील व पायल प्रभाकर पाटील (तृतीय वर्ष वाणिज्य) या विद्यार्थिनींनी भित्तिपत्रके तयार केली होती. विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक विषयावर जागृती व्हावी व त्यांना वाणिज्य क्षेत्रातील चालू घडामोडींविषयी माहिती व्हावी, हे या भित्तीपत्रकांमागील उद्देश आहे.
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ संचालक दत्तात्रय पवार, विनय जकातदार, विजय देशपांडे यांच्या हस्ते या भित्तिपत्रकांचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड, उपप्राचार्य डॉ. दीपक मराठे, कला व वाणिज्य शाखेचे समन्वयक प्रा.डॉ. एस. डी. भैसे, माजी तालुका कृषी अधिकारी जाधव, डॉ. ए.एन. भंगाळे, डॉ. दिनेश तांदळे, डॉ. अतुल देशमुख यांची उपस्थिती होती. वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. सचिन हडोळतीकर, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. गजानन चौधरी, प्रा. मयूर दायमा, प्रा. श्रद्धा ठाकूर यांचे भित्तिपत्रकांसाठी विद्यार्थिनींना मार्गदर्शन लाभले.



