
भडगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर महसूल विभागाची धडक कारवाई; दोन डंपर जप्त.!!!
भडगाव प्रतिनिधी :-
तहसीलदार शीतल सोलाट मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ९ फेब्रुवारी २०२६ रोजी चाळीसगाव रोड, भडगाव येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या दोन डंपरवर धडक कारवाई करण्यात आली. सदर डंपर जप्त करून तहसील कार्यालय, भडगाव येथे जमा करण्यात आले आहेत.
अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून शासनाच्या आदेशानुसार अशा कारवायांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार महसूल विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.
या कारवाईत नायब तहसीलदार श्री. देवकर रावसाहेब, ग्राम महसूल अधिकारी पी. के. पाटील, दीपक पाटील, राहुल माळी, प्रशांत कुंभारे, महसूल सहायक महादू कोळी व पोलीस कॉन्स्टेबल पी. सी. कोळी सहभागी होते.
या कारवाईमुळे परिसरातील अवैध वाळू वाहतुकीला आळा बसेल, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त करण्यात येत आहे.



