जळगावमहाराष्ट्रशैक्षणिक

लाडकुबाई प्राथमिक विद्यामंदिर येथे मातृ पितृ पूजन सोहळा संपन्न.!!!

लाडकुबाई प्राथमिक विद्यामंदिर येथे मातृ पितृ पूजन सोहळा संपन्न.!!!

भडगाव प्रतिनिधी :- जावेद शेख

कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था संचलित, लाडकुबाई प्राथमिक विद्यामंदिर येथे प्रेम दिनाचे औचित्य साधून माता पिता पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. शाळेचे मुख्याध्यापक श्री कमलेश शिंदे सर व प्रतिष्ठित मान्यवर पालकांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. चिमुकल्यांनी माता पितांचे औक्षण केले. गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा दिल्या. अत्यंत भावनिक सोहळा संपन्न झाला. शाळेच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना मातापित्यांचा आदर करण्याचे, शिस्तीचे पालन करण्याचे आवाहन केले. शाळेतील पालक श्री भास्कर कासार यांनी लाडकुबाई शाळेच्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचे कौतुक केले. तसेच प्रदीप कोळी, रविता शिंदे, रोहिणी पाटील, रावसाहेब भदाने, दिनेश बोरसे, मनोज माळी,सरला महाजन, जयश्री पाटील, छाया सुतार, महादेवी पाटील या सर्व पालकांनी लाडकुबाई शाळा वर्षभर राबवत असणाऱ्या विविध उत्कृष्ट कार्यक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे फलक लेखन श्री अनंत हिरे तर सूत्रसंचालन श्री ज्ञानेश्वर गांगुर्डे यांनी केले. शाळेचे मुख्याध्यापक श्री कमलेश शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर उपक्रम संपन्न झाला. शाळेतील श्रीमती संगीता शेलार, सुनिता देवरे, अनिता सैंदाणे, श्री अनंत हिरे, ज्ञानेश्वर गांगुर्डे, सुयोग पाटील, सचिन पाटील, हरिचंद्र पाटील, किरण पाटील व शिक्षकेतर कर्मचारी चंद्रकांत पाटील यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.*

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!