जिल्ह्यातील पोषण आहारातून अंडी गायब.!!!
सोलापूर प्रतिनिधी :-
जिल्ह्यातील चार लाख 68 हजार विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जातो. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून पोषण आहाराचे अनुदान रखडल्याने पोषण आहारातून अंडी गायब झाल्याचे चित्र जिल्ह्यातील अनेक शाळेत दिसत आहे.
अशा शाळांवर कारवाई करण्याची गरज असल्याचे पालकांतून बोलले जात आहे.
थंडीच्या दिवसांत विद्यार्थ्यांच्या पोषणासाठी शाळांमध्ये अंडी देणे गरजेचे आहे, पण नेमक्या त्याच काळात आहारातून अंडी गायब झाली आहेत. अंडी न खाणार्या विद्यार्थ्यांना पर्याय म्हणून केळी, फळे पुरवण्याचा शासन निर्णय आहे; परंतु हा निर्णय कागदावरच राहत असल्याचे चित्र सध्या जिल्ह्यातील अनेक शाळेत दिसत आहे. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा अंडी देण्याचा निर्णय झाला. मात्र, याकडे शाळेकडून दुर्लक्ष होत असल्याने जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी हिवाळ्यात अंड्यांपासून वंचित राहात आहेत. ऐन हिवाळ्यामध्येत पोषण आहारातून अंडी गायब झाली आहेत. याकडे शासन व प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून पालक वर्गातून होत आहे.
– वैभव राऊत, लेखाधिकारी, शालेय पोषण आहारपोषण आहाराचे अनुदान मिळावे, यासाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी प्राथमिक शिक्षण संचालक पुणे यांच्याकडे प्रस्ताव पाठविला आहे. त्या पत्रानुसार लवकरच अनुदान मिळणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शाळांनी विद्यार्थ्यांना पोषण आहाराचे वाटप करावे. तसेच ज्या शाळा पोषण आहारामध्ये अंडी देणार नाहीत, अशा शाळांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.