सराफा पेढ्यांवर सोनं खरेदी करणा-यांऐवजी विकणारे ग्राहक जास्त दिसू लागले आहेत.सोन्याचा भाव 55 हजार रुपये तोळ्यांवर येणार.?
सराफा पेढ्यांवर सोनं खरेदी करणा-यांऐवजी विकणारे ग्राहक जास्त दिसू लागले आहेत.सोन्याचा भाव 55 हजार रुपये तोळ्यांवर येणार.?
घसरणीच्या भीतीनं सोनं मोडीत काढण्याची घाई
अफवेमुळं ग्राहकांकडून सोनं विक्री
94 हजार रुपये तोळं किमतीला पोहचलेलं सोनं गेल्या काही दिवसांपासून उतरणीला लागलं आहे. सोन्याच्या किंमतीत अचानक घसरण होऊ लागली आहे. सोन्याचा भाव 55 हजार रुपये तोळे एवढा होणार अशी चर्चा सुरु झाली आहे. या चर्चेची लोकांनी एवढी धास्ती घेतलीये की सुवर्णनगरी जळगावमध्ये लोकांनी दागिने मोडण्यास सुरुवात केली आहे. आता जेवढा भाव आहे तेवढा भाव मिळाली तरी काही पैसे मिळतील अशी भावना असल्यानं लोकांनी तयार केलेले दागिने मोडण्यास सुरुवात केली आहे.
सोन्याचा भाव एक लाख रुपयांवर जाईल या आशेनं अनेकांनी पूर्वीच सोनं खरेदी केली. त्यांना आता सोन्याच्या भावात घसरण झाल्यानं सोनं विक्री करायला सुरुवात केलीय असं दुकानदार सांगतात.
एकाचवेळी शेअर मार्केट कोसळणं आणि सोन्याच्या भावात घसरण होणं असं सहसा होत नाही. पण काही जागतिक घडामोडींमुळं सोनं घसरणीला लागल्याचं तज्ज्ञ सांगू लागले आहेत.
सोन्याचे दर का घसरले.?
सोन्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढलं
ऑस्ट्रेलियानंही सोन्याचं उत्पादन वाढवलं
रिसायकल सोन्याचा पुरवठा देखील वाढला केंद्रीय बँकांकडून 1 हजार 45 टन सोने खरेदी.71 केंद्रीय बँका सोने साठा कमी करु शकतात
त्यामुळं सोन्याचे भाव घसरणीला लागल्याचं सांगण्यात येत आहे. पण सोनं 55 हजार रुपये तोळ्यावर येण्याची शक्यता फारच कमी असल्याचा दावा तज्ज्ञ करत आहेत.
सोनं खरेदी ही गुंतवणूक कायम चांगला नफा देणारी ठरली आहे. यावेळी सोन्याच्या भावात झालेली घसरणही ग्राहकांच्या पथ्यावर पडेल असं सांगण्यात येत आहे. फक्त सोन्याचा 55 हजार रुपयांपर्यंतचा घसरणीचा अंदाज खरा ठरणार का याबाबत उत्सुकता कायम आहे.