
कजगाव येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.!!!
भडगाव ता. प्रतिनिधी :-अमीन पिंजारी
भडगाव तालुक्यातील कजगाव येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत ७७ वा भारतीय प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहात व विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. कजगावचे उपसरपंच सादिक मणियार यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात झाली.
यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनात उत्कृष्ट कामगिरी करत जिल्हास्तरावर निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच ‘रंग उत्सव सेलिब्रेशन’ अंतर्गत आयोजित आंतरराष्ट्रीय घट स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पदके व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमास मौलाना रियाज, हाफिज सफ्फर, हाजी शफी मणियार, शौकत पिंजारी, जाकीर खाटीक, खालिक मणियार, खलील मणियार, अबरार खाटीक, अन्वर बागवान, नाजिम मणियार, आफताब खाटीक, मन्नान खाटीक, अली खाटीक, रियाज खाटीक, इम्रान मणियार, आसिफ पिंजारी, अरमान मणियार यांच्यासह शाळेचे शिक्षक, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.संपूर्ण कार्यक्रम देशभक्तीच्या वातावरणात व उत्साहात पार पडला.



