क्रीडाजळगाव

नांदेडच्या राज्यस्तरीय थायबॉक्सिंग स्पर्धेत चाळीसगावचा सुवर्णझंझावात; खेळाडूंचा भव्य सत्कार सोहळ्यात गौरव.!!!

नांदेडच्या राज्यस्तरीय थायबॉक्सिंग स्पर्धेत चाळीसगावचा सुवर्णझंझावात; खेळाडूंचा भव्य सत्कार सोहळ्यात गौरव

चाळीसगाव प्रतिनिधी :-

नांदेड येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय थायबॉक्सिंग स्पर्धेत चाळीसगावच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन करत सुवर्णपदकांची लयलूट केली. या शानदार कामगिरीमुळे चाळीसगाव शहराच्या क्रीडा क्षेत्रातील मान अधिक उंचावली असून शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. या ऐतिहासिक यशाबद्दल चाळीसगाव येथे खेळाडूंचा भव्य सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

या सत्कार समारंभाचे आयोजन स्थानिक क्रीडाप्रेमी व संबंधित संघटनेच्या वतीने करण्यात आले होते. जिल्हाध्यक्ष हाजी जाकीर कुरेशी साहेब यांच्या शुभहस्ते व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी तालुका सचिव आयान खान, संघटनेचे विविध पदाधिकारी, प्रशिक्षक, पालकवर्ग तसेच मोठ्या संख्येने क्रीडाप्रेमी उपस्थित होते.

नांदेड येथे झालेल्या या राज्यस्तरीय थायबॉक्सिंग स्पर्धेत चाळीसगावच्या खेळाडूंनी विविध वजनगटांमध्ये दमदार खेळाचे प्रदर्शन करत सुवर्ण व रौप्य पदकांवर आपले नाव कोरले. सुवर्णपदक विजेते खेळाडूंमध्ये मोह्तशिम मुश्रिफ खान, इझान जुबेर रंगरेज, अरबाज सरफराज मन्यार, झिशान जमील रंगरेज, रेहान अली अशरफ अली, मोहनिश राजेश चांडाळे, फैजान अकरम शेख, नूरसबा शेख सादिक, ओम गौतम गोयार तसेच अनुज कुमार शुक्ला यांचा समावेश आहे. तर रोझेन शेख रफिक याने उत्कृष्ट कामगिरी करत रौप्यपदकाची कमाई केली.

या यशामागे खेळाडूंचा सातत्यपूर्ण सराव, कठोर मेहनत, प्रशिक्षकांचे शिस्तबद्ध मार्गदर्शन तसेच पालकांचा मोलाचा पाठिंबा महत्त्वाचा ठरल्याचे मान्यवरांनी आपल्या भाषणात नमूद केले. जिल्हाध्यक्ष हाजी जाकीर कुरेशी साहेब यांनी खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही अशीच घवघवीत कामगिरी करण्याचा संदेश दिला. तालुका सचिव आयान खान यांनी खेळाडूंच्या जिद्द, चिकाटी व शिस्तीचे विशेष कौतुक करत भविष्यात अधिकाधिक स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन चाळीसगावचे नाव राज्य व देशपातळीवर उज्ज्वल करण्याचे आवाहन केले.

या सत्कार सोहळ्यामुळे खेळाडूंमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून परिसरातील युवकांना क्रीडा क्षेत्राकडे वळण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे. चाळीसगावमध्ये क्रीडा संस्कृती अधिक बळकट होण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला असून शहराच्या क्रीडा विकासाला नवी दिशा देणारा ठरला आहे.

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!