जळगावमहाराष्ट्रसामाजिक

भडगाव येथे संत रविदास महाराज जयंती उत्साहात साजरी.!!!

राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन

भडगाव येथे संत रविदास महाराज जयंती उत्साहात साजरी.!!!

राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन

भडगाव  प्रतिनिधी

राष्ट्रीय चर्मकार महासंघ, भडगाव शहर यांच्या वतीने जगतगुरू संत रविदास महाराज जयंती उत्सव रविवार, दि. १ फेब्रुवारी २०२६ रोजी अत्यंत उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळी ८:३० वाजता संत रविदास महाराज मंदिरात मूर्तीपूजन, आरती व भजन कार्यक्रम पार पडला. यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संत रविदास महाराजांना अभिवादन केले.

या निमित्ताने भडगाव शहरातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये जयंती उत्सव साजरा करण्यात आला. तसेच महादेव गल्ली, टोणगाव, यशवंत नगर आदी परिसरात समाज बांधवांनी विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली.

सायंकाळी ६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक (पारोळा चौफुली) येथे संत रविदास महाराज यांचे आकर्षक छोटे स्टेज (मंदिर) उभारण्यात आले होते. येथे दिवसभर भाविकांसाठी दर्शनाची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये संत रविदास महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, प्रा. सावित्रीआई फुले, महाराणा प्रताप, वीर एकलव्य तसेच इतर महापुरुषांच्या मूर्तींचे विधीवत पूजन करण्यात आले.

या कार्यक्रमास राष्ट्रीय चर्मकार महासंघ जिल्हाध्यक्ष ईश्वरलाल अहिरे, भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश शर्मा, कर्मचारी निलेश ब्राम्हणकर व राजू पाटील, भडगाव नगर परिषदेच्या नगराध्यक्षा रेखाताई प्रदीप मालचे, उपनगराध्यक्ष राजेंद्र जिभाऊ पाटील यांचे सुपुत्र सौरभ पाटील, माजी नगराध्यक्ष शशिकांत येवले, गटनेते लखीचंद पाटील, तसेच शिवसेना, भाजप, भारत मुक्ती मोर्चा, एकलव्य संघटना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान आदी संघटनांचे पदाधिकारी व नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याशिवाय पत्रकार बांधव अशोक परदेशी, संजय पवार, लक्ष्मीकांत देसले, सागर महाजन, नितीन महाजन, देविदास महाजन, सुरेश पाटील, डी. व्ही. भोसले, भारत चव्हाण, निलेश महाले, संजय शेवाळे आदी उपस्थित होते. तसेच तहसीलदार राजेंद्र अहिरे, विविध शासकीय अधिकारी, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, महिला पदाधिकारी व नागरिकांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रवीण महाजन सर यांनी अत्यंत प्रभावीपणे केले. तर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल रविभाऊ अहिरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. संपूर्ण कार्यक्रम शांततामय, भक्तिमय व सामाजिक सलोख्याच्या वातावरणात संपन्न झाला.

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!