जळगावसामाजिक

इमरान अली सैय्यद यांची आरोग्य सभापतीपदी निवड नगरदेवळ्यात अभिनंदनाचा वर्षाव.!!!

इमरान अली सैय्यद यांची आरोग्य सभापतीपदी निवड नगरदेवळ्यात अभिनंदनाचा वर्षाव.!!!

भडगाव प्रतिनिधी :-

भडगाव नगरपालिका नगरसेवक इमरान अली सैय्यद यांची आरोग्य सभापतीपदी निवड झाल्याबद्दल नगरदेवळा येथे त्यांचा जाहीर सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास समाजसेवक जिब्बू दादा, अन्वर शेख, अमीर शेख, रऊफ बागवान, आसिफ बागवान, सलीम शाह, फरीद मिस्तरी, हमीद मिजवान, अजीम शेख, अयासोद्दीन काझी, रजाक पिजारी, अयाज बेग व मित्रपरिवारासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी उपस्थित मान्यवरांनी पुष्पगुच्छ, शाल व सन्मानचिन्ह देऊन इमरान अली सैय्यद यांचा सत्कार केला. याप्रसंगी बोलताना उपस्थित वक्त्यांनी त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा आढावा घेतला व आरोग्य सभापती म्हणून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. शहरातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, पारदर्शक व लोकाभिमुख करण्यासाठी त्यांनी प्रभावी कामगिरी करावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

सत्काराला उत्तर देताना इमरान अली सैय्यद यांनी नागरिकांचे आभार मानले. शहरातील सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे, स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम करणे, तसेच माता-बाल संगोपन, लसीकरण, रोग प्रतिबंधक उपाययोजना व सार्वजनिक आरोग्याबाबत जनजागृती करण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. नगरपालिकेच्या माध्यमातून आरोग्य विषयक योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व सहकाऱ्यांच्या सहकार्याने कार्य करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाचे आयोजन नगरदेवळा येथील मित्रपरिवार व सामाजिक कार्यकर्त्यांनी केले होते. कार्यक्रम शांततामय व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. शेवटी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!