जळगावशासकीयसामाजिक

कासोदा येथील शितोळे पंचम मंडळ संचलित सार्वजनिक माध्यमिक विद्यालयात ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.!!!

कासोदा येथील शितोळे पंचम मंडळ संचलित सार्वजनिक माध्यमिक विद्यालयात ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.!!!

कासोदा प्रतिनिधी :-

एरंडोल तालुक्यातील कासोदा येथील शितोळे पंचम मंडळ संचलित सार्वजनिक माध्यमिक विद्यालयात आज दि. २६ जानेवारी २०२६ रोजी भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व राष्ट्रभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जगन्नाथ पाटील यांनी भूषविले. यावेळी ध्वजारोहण ज्ञानेश्वर शितोळे यांच्या हस्ते करण्यात आले.

ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत व राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बोरसे सर यांनी केले. आपल्या भाषणात त्यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांनी संविधानिक मूल्ये आत्मसात करावीत, असे आवाहन केले.

यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची शपथ दिली. तसेच संविधान वाचन, कवायत व विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, नृत्य व भाषणांद्वारे उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे माँसाहेब जिजाऊ यांच्या जीवनावर आधारित एकांकिका. ही एकांकिका विद्यार्थिनी रिया ईश्वर पाटील हिने अत्यंत प्रभावीपणे सादर केली. तिच्या अभिनयाचे उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात कौतुक केले.

संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूर्यकांत सोनवणे यांनी सुबक व प्रभावी पद्धतीने केले. या कार्यक्रमास संस्थेचे सचिव शालिग्राम शितोळे, उपाध्यक्ष धर्मराज शितोळे, चेअरमन नरेंद्र पाटील, पत्रकार सागर शेलार, ॲड. वासुदेव वारे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे कासोदा शहर अध्यक्ष शैलेश पांडे, ग्रामस्थ, संस्थेचे संचालक मंडळ, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक युनूस सय्यद यांनी उपस्थित सर्व मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!