
सौ. समीक्षा पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य हळदी-कुंकू उत्सव
भडगाव प्रतिनिधी :-
शिवसेना–युवासेना व स्व. बापूजी युवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भडगाव शहरातील प्रभाग क्र. ८ येथील माता-भगिनींसाठी महिला व बालकल्याण सभापती तथा नगरसेविका सौ. समीक्षा लखीचंद पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य व दिमाखदार हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात उखाणे, नाच-गाणी, मनोरंजनात्मक खेळ व आकर्षक भेटवस्तूंमुळे संपूर्ण परिसर आनंदमय वातावरणाने भारावून गेला. निवेदिका मोनाली कोठावदे यांनी अत्यंत उत्साही आणि प्रभावी शैलीत कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. महिलांचा उत्स्फूर्त सहभाग, त्यांचा जल्लोष आणि चेहऱ्यावर झळकणारा आनंद हा या कार्यक्रमाच्या यशाचा खरा परिपाक ठरला.
या प्रसंगी प्रमुख उपस्थितीत प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा रेखाताई मालचे, नगरसेविका योगिता येवले, माहेश्वरी देशमुख, सौ. किरण पाटील, कल्पना भोई, वैशाली महाजन, योजना पाटील, वैशाली पाटील, सुनंदा पाटील, पुष्पा परदेशी, सीमा महाजन, जया महाजन, श्वेता ततार, सारिका पाटील, मेनका महाजन यांच्यासह महिला पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व मान्यवरांनी सौ. समीक्षा पाटील व आयोजकांचे कौतुक केले. या उपक्रमामुळे महिलांमध्ये उत्साह, आत्मविश्वास व सामाजिक सलोखा वृद्धिंगत झाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.



