जळगावशैक्षणिकसामाजिक

प्रजासत्ताक दिनानिमित्त कुरेशी गोहर इंग्लिश मीडियम स्कूल येथे भव्य गॅदरिंग कार्यक्रम संपन्न.!!!

प्रजासत्ताक दिनानिमित्त कुरेशी गोहर इंग्लिश मीडियम स्कूल येथे भव्य गॅदरिंग कार्यक्रम संपन्न.!!!

भडगाव प्रतिनिधी :—

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून भडगाव येथील कुरेशी गोहर इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये भव्य गॅदरिंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीत, नृत्य, भाषणे तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमाची सुरुवात कुराण शरीफच्या पठणाने करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी भारताचे स्वातंत्र्य, संविधानाचे महत्त्व आणि राष्ट्रप्रेम यावर आधारित प्रभावी भाषणे सादर केली. विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर गीत व नृत्यांनी संपूर्ण कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग, पालक तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करत त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. संविधानाचे पालन करणे आणि जबाबदार नागरिक बनणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे मत त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या शेवटी उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष हाजी जाकीर कुरेशी, नवनिर्वाचित नगरसेवक इमरान अली सैय्यद, संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य तथा नगरसेवक आसिम भाऊ मिर्झा, नगरसेवक हाजी खलील शेख, अलीम शाह, पत्रकार जावेद शेख, अबरार मिर्झा, सन ग्रीन पावरटेकचे संस्थापक जमाल भाऊ कासार, एच.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक मुजम्मील शेख, राही मल्टीपर्पज फाउंडेशनचे अध्यक्ष दानिश आलम, असरार खान,यांच्यासह पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!