HSRP नंबरप्लेटचा गेम काय? गुजरातमध्ये 200, गोव्यात 155; महाराष्ट्रात एवढी महाग का? वाचा सविस्तर.!!!
सध्याची नंबर प्लेट प्रभावी असताना HSRP सक्ती का? वाहन 4 प्रणालीमुळे सेकंदात मिळते संपूर्ण माहिती! महाराष्ट्रातील RTO विभागाने वाहन 4 ही ऑनलाइन प्रणाली विकसित केली आहे, जी RTO, वाहतूक पोलिस आणि अन्य यंत्रणांसाठी उपलब्ध आहे
या प्रणालीद्वारे केवळ वाहनाचा नंबर टाकताच त्या वाहनासंबंधी सर्व महत्त्वाची माहिती – मालकाचे तपशील, वाहनाची नोंदणी, इन्शुरन्स, प्रदूषण प्रमाणपत्र यासारखी माहिती काही सेकंदांत मिळते. अशा स्थितीतही 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या सर्व जुन्या वाहनांसाठी 31 मार्चपर्यंत HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) सक्तीची का केली जात आहे? जुनी आणि नवीन नंबर प्लेटमध्ये नेमका काय फरक आहे? हा निर्णय वाहनधारकांवर का लादला जात आहे? असे अनेक प्रश्न आता वाहनधारकांमधून विचारले जात आहेत.
HSRP नंबर प्लेटचे राज्यनिहाय दर – महाराष्ट्रात सर्वाधिक खर्च!
महाराष्ट्रात HSRP नंबर प्लेटसाठी जास्त शुल्क घेतले जात असून, इतर राज्यांच्या तुलनेत हे दर अधिक असल्याचे दिसून येते.
रिक्षा (तीनचाकी वाहन)
महाराष्ट्र: ₹500
गुजरात: ₹200
गोवा: ₹155
पंजाब: ₹270
आंध्रप्रदेश: ₹282
मोटार कार
महाराष्ट्र: ₹745
गुजरात: ₹460
गोवा: ₹203
पंजाब: ₹594
आंध्रप्रदेश: ₹619
व्यावसायिक वाहन (ट्रक, बस इ.)
महाराष्ट्र: ₹745
गुजरात: ₹480
गोवा: ₹232
पंजाब: ₹634
आंध्रप्रदेश: ₹642
अनेक वाहनधारकांचा आक्षेप आहे की, वन नेशन, वन टॅक्स या धोरणाचा आधार घेतला जात असताना, नंबर प्लेटसाठी एवढा मोठा खर्च का लादला जात आहे?
HSRP नंबर प्लेटचं कंत्राट – हजारो कोटींचा व्यवहार?
महाराष्ट्र परिवहन विभागाने देशातील सर्वाधिक दर असणाऱ्या तीन कंपन्यांना HSRP नंबर प्लेट तयार करण्याचे कंत्राट दिले आहे.
FTA HSRP Solutions Pvt. Ltd. या गुजरातस्थित कंपनीला जळगावसह महाराष्ट्रातील बहुतांश भागात काम देण्यात आले आहे.
या कंत्राटाची एकूण रक्कम 600 कोटी दाखवण्यात आली असली तरी, प्रत्यक्षात संपूर्ण महाराष्ट्रातील वाहनांवर ही नंबर प्लेट बसवल्यास हा व्यवहार 1,500 कोटींपर्यंत जाऊ शकतो, असा आरोप जनमंच संघटनेचे अध्यक्ष राजीव जगताप यांनी केला आहे.
HSRP सक्तीमागचे कारण? वाहनधारकांचा आक्षेप
2019 पासून विक्री होणाऱ्या सर्व नवीन वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवूनच दिली जात आहे. मग जुन्या वाहनधारकांना वेठीस का धरले जाते?
HSRP नंबर प्लेटवरील QR कोड स्कॅन करून वाहनाची सर्व माहिती मिळते, असे सांगितले जाते. पण सध्याच्या वाहन 4 प्रणालीद्वारेही पोलिसांना ही माहिती सहज मिळते. मग नवीन नंबर प्लेटची गरजच काय?
HSRP नंबर प्लेटसाठी एजन्सी नियुक्त करून ऑनलाइन अपॉइंटमेंट घेण्याची अट घालण्यात आली आहे, ज्यामुळे संपूर्ण प्रक्रिया त्रासदायक आणि खर्चिक ठरत आहे.
इतर राज्यांमध्ये HSRP नंबर प्लेट ₹150-₹450 दरम्यान उपलब्ध असताना, महाराष्ट्रात तब्बल ₹745 शुल्क का आकारले जाते?
सध्याच्या नंबर प्लेटपेक्षा HSRP कशी वेगळी?
HSRP नंबर प्लेट विशेष अॅल्युमिनियमपासून बनवलेली असते.
यात क्रोमियम-आधारित अशोक चक्र होलोग्राम आणि “IND” कोड असतो.
10-अंकी लेझर एनग्रेव्ह केलेला कोड टेंपर-प्रूफ असल्याचा दावा केला जातो.
परंतु, वाहन 4 प्रणाली आधीच अस्तित्वात असताना HSRP नंबर प्लेट सक्तीने बसवण्यामागे प्रत्यक्ष कारण काय? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
महाराष्ट्रातील वाहनधारकांना भेडसावणाऱ्या समस्या
नंबर प्लेटसाठी अनावश्यक खर्च – इतर राज्यांच्या तुलनेत अधिक दर.
नवीन सिस्टम सक्तीने लादली जाणे – जुन्या वाहनांसाठी सक्ती का?
अत्यंत जटिल प्रक्रिया – ऑनलाइन अपॉइंटमेंट, एजन्सीकडून फिटिंगचा आग्रह.
कंत्राटीकरणाचा मुद्दा – विशिष्ट कंपन्यांनाच लाभ देण्यासाठी हा निर्णय?
HSRP नंबर प्लेट सक्ती मागे घेतली जावी किंवा वाहनधारकांना अधिक स्वस्त पर्याय उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.