मुंबईसह महाराष्ट्रभर आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा

63 / 100 SEO Score

मुंबईसह महाराष्ट्रभर आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजराIMG 20260621 WA1433

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : “योगा फॉर हेल्दी एजिंग (निरोगी वृद्धत्वासाठी योग)” या संकल्पनेने प्रेरित होऊन यंदाचा १२ वा आंतरराष्ट्रीय योगदिन महाराष्ट्रासह देशभर उत्साहात साजरा करण्यात आला. भारतातील प्रत्येक नागरिकाने आपल्या दैनंदिन जीवनात योगाचा अंगीकार करून निरोगी, सुदृढ आणि संतुलित आयुष्याची वाटचाल करावी, असा संदेश यानिमित्त देण्यात आला.IMG 20260621 WA1435

योग हे केवळ शारीरिक आरोग्याचे नव्हे, तर मानसिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्याचेही प्रभावी साधन असल्याची भावना व्यक्त करत महाराष्ट्र योगशिक्षक संघ (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने राज्यासह देशभर योगसाधना आणि जनजागृतीचे विविध उपक्रम राबविण्यात आले. समाज निरोगी, सुदृढ आणि सक्षम राहावा यासाठी महाराष्ट्रातील योगशिक्षक अहोरात्र कार्यरत असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.IMG 20260621 WA1436

महाराष्ट्र योगशिक्षक संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मनोज निलपवार यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार, २१ जून २०२६ रोजी महाराष्ट्र योगशिक्षक संघ, मुंबई जिल्ह्यातर्फे १२ वा आंतरराष्ट्रीय योगदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमात मुलुंड येथील स्थानिक नगरसेवक व स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे तसेच अस्लफा घाटकोपर येथील स्थानिक नगरसेवक किरणभाऊ लांडगे उपस्थित होते.

योगशिक्षक दिलीप घाडगे, रुपाली शिंदे, संतोष खरटमोल, अनिल शिंदे, लक्ष्मीबेन गजरा, राजश्री मोरे, रेखा भिंगार्डे, सोनाली चव्हाण, सोनल पिंगळे, राखी सोनवणे, मेघा वालावलकर, ईश्वरी शिंदे, सविता कदम, बाळू शिंदे, भानुदास मगदूम आणि संजीवनी शेटे यांच्या टीमने मराठा मंडळ मुलुंड, देशमुख गार्डन, नवघर सभागृह मुलुंड पूर्व व पश्चिम येथे योगदिनाचे कार्यक्रम आयोजित केले.

रिद्धी देवघरकर आणि अमित चिबडे यांनी अमित रिद्धी योगशाळामार्फत एवरशाईन नगर, मालाड पूर्व येथे योगसत्रांचे आयोजन केले. मनुजा चव्हाण, हिरा गणवीर, केशर कुलाबकर, शालिनी भंडारी, भारती कावनकर आणि रेश्मा पाटील यांनी कांदिवली चारकोप परिसरात योगदिन साजरा केला. कृष्णाकुमार शिंदे यांनी सायन धारावी परिसरात, सुमन नागरे यांनी ताडदेव येथील युसूफ मेहअरली विद्यालयात, तर साक्षी कलगुटकर, अर्निका बांदेलकर आणि प्रसाद काठे यांनी अस्लफा येथील जोगर्स पार्क घाटकोपर येथे योगदिनाचे उपक्रम राबविले.

मुंबईतील विविध भागांमध्ये महाराष्ट्र योगशिक्षक संघाच्या मुंबई जिल्हा टीमच्या माध्यमातून योगदिन आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थी, पालक, योगसाधक तसेच स्थानिक रहिवाशांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

२१ जून २०२६ रोजी साजऱ्या करण्यात आलेल्या १२ व्या आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त आयोजित कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान दिलेल्या सर्व योगवीर आणि योगवीरांगनांचे मुंबई जिल्हाध्यक्ष मनुजा चव्हाण तसेच राज्य कोषाध्यक्ष संतोष खरटमोल यांनी मनःपूर्वक आभार मानले. सहभागी योगशिक्षकांच्या पुढील वाटचालीस त्यांनी शुभेच्छाही दिल्या.

महाराष्ट्र योगशिक्षक संघाच्या माध्यमातून योगविषयक जनजागृती, निरोगी जीवनशैलीचा प्रसार आणि समाजाच्या सर्वांगीण आरोग्यवृद्धीसाठीचे कार्य भविष्यातही अधिक व्यापक स्वरूपात सुरू राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!