सुमित किशोर आप्पा पाटील यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा.!!!
भडगाव प्रतिनिधी :-
पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांचे चिरंजीव . सुमित किशोर आप्पा पाटील यांचा वाढदिवस आज भडगाव शहरात जल्लोषात साजरा करण्यात आला.
भडगाव शहरासह तालुक्यातील अनेक राजकीय कार्यकर्ते, तरुण मित्र आणि चाहत्यांनी डीजे, ढोल-ताशांच्या गजरात सुमित पाटील यांना शुभेच्छा दिल्या. छत्रपती शिवाजी महाराज चौफुली पारोळा रोड भडगाव येथे केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
हा कार्यक्रम स्व. बापूजी फाउंडेशनचे संस्थापक, कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा चे संचालक आणि जळगाव लोकसभा क्षेत्र युवा सेनेचे जिल्हाप्रमुख लखीचंद भाऊ पाटील यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता.
यावेळी भडगाव नगरपालिकेचे, शिवसेनेचे माजी नगरसेवक, युवा सेनेचे पदाधिकारी तसेच विविध मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात सर्वांनी. सुमित पाटील यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
