भडगावात आंतरराष्ट्रीय रंगोत्सव सेलिब्रेशन स्पर्धेचे आयोजन.!!!
भडगाव प्रतिनिधी :-
शहरातील वाय. एम. खान उर्दू हायस्कूलमध्ये रंगोत्सव सेलिब्रेशन मुंबई यांच्या विद्यमाने आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत मोठ्या उत्साहाने भाग घेतला.
या स्पर्धेत खालील शाळांनी सहभाग घेतला:
एच. बी. ए. इंग्लिश प्राथमिक व हायस्कूल
वाय. एम. खान उर्दू हायस्कूल
झेड. पी. स्कूल नंबर १भडगाव
अँग्लो उर्दू हायस्कुल भडगाव
टी. आर. पाटील हायस्कूल
बुरहानी इंग्लिश स्कूल, पाचोरा
या स्पर्धेच्या आयोजनामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाला आणि त्यांच्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धात्मक वातावरण निर्माण झाले.
स्पर्धेचे फायदे
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो.
आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धात्मक वातावरण निर्माण होते.
विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो.
नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात.
रंगोत्सव सेलिब्रेशन मुंबई शाखेचे.पर्यवेक्षक अमीन सर, दानिश सर, मोबिन सर, विद्या सोनजे मैडम इवेंट डायरेक्टर मुज़म्मिल शेख सर यांनी मोलाची कामगिरी केली