सेवा पंधरवडा सप्ताहांतर्गत टोणगांव मराठी शाळेत निबंध, चित्रकला व रांगोळी स्पर्धा बक्षीस वितरण.!!!
भडगांव प्रतिनिधी :-
भारताचे पतंप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांचा वाढदिवस ते महात्मा गांधी जयंती पर्यंत सेवा पंधरवडा सप्ताह अंतर्गत टोणगांव भडगांव येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत निबंध, चित्रकला व रांगोळी स्पर्धा संपन्न झाल्या. त्यासोबतच सदर सेवा पंधरवड्यात शासनाचे विविध क्षैक्षणिक, सामाजिक लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात आल्याचे शालेय व्यवस्थापन समिती सदस्य मा. नगरसेविका योजनाताई पाटील यांनी बक्षिस वितरण प्रसंगी नमूद केले. पंधरवडा यशस्वितेसाठी मुख्याध्यापिका मिराताई साळुंखे, कार्यकारणी सदस्य पदाधिकारी अनुक्रमे नूतनताई पाटील, रेखाताई पाटील, मनिषाताई पाटील, सुरेखाताई वाघ, निताताई भांडारकर, उषाताई परदेशी, जिजाताई चव्हाण, सुरेखाताई पाटील, सोनालीताई पाटील, मिनाक्षीताई पाटील, प्रतिभाताई पाटील, उपशिक्षिका अनुक्रमे ज्योतीताई साळुंखे, रजनीताई पाटील, शर्मिलाताई सूर्यवंशी, भारतीताई गरुड, उज्वलाताई पवार, श्रुतीताई कदम सह पालक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.