आपल्या जादुई डोळ्यांनी घायाळ करणाऱ्या मोनालिसाला मिळाली मोठी ऑफर; लवकरच झळकणार मोठ्या पडद्यावर

0 499

आपल्या जादुई डोळ्यांनी घायाळ करणाऱ्या मोनालिसाला मिळाली मोठी ऑफर; लवकरच झळकणार मोठ्या पडद्यावर

 

महाकुंभमेळ्यात सर्वांना वेड लावणाऱ्या मोनालिसाला मोठी ऑफर मिळाली आहे. चित्रपट निर्माते सनोज मिश्राने तिला त्यांच्या आगामी चित्रपट ‘द डायरी ऑफ मणिपूर’मध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून काम करण्याची ऑफर दिली.

विशेष म्हणजे मोनालिसाने ही ऑफर स्विकारली आहे.

 

आपल्या जादुई डोळ्यांनी घायाळ करणारी मोनालिसा ही मुळची इंदूरची आहे. कुंभमेळ्यात तिच्या वडिलांसोबत माळा विकण्यासाठी आली होती. सुंदर डोळे, सावळा रंग, नजरेत ठामपणा आणि त्या सावळ्या रंगावर चमकणारी तेजस्वी सुंदरता पाहून लोक भारवले. दरम्यान, आता ती रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.

 

‘द डायरी ऑफ मणिपूर’ चित्रपट ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या चित्रपटात मोनालिसा ही एका निवृत्त आर्मी ऑफिसरच्या मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण ईशान्य भारतात होणार आहे.

 

शूटिंगपूर्वी मोनालिसाला तीन महिने मुंबईत अभिनयाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सनोज मिश्रा यांनी एका वृत्तसंस्थेवर मोनालिसाचा मुलाखत पाहिली. त्यानंतर तिच्या शोधात ते कुंभमेळ्यात पोहचले. त्यावेळी तिच्या कुटुंबातील व्यक्तींची मिश्रा यांनी भेट घेतली. या भेटीदरम्यान मोबाईलवरुन मोनालिसा आणि तिच्या वडिलांशी संवाद साधला.

 

सनोज मिश्राच्या म्हणण्यानुसार, चित्रपटात काम मिळण्याची ऑफर ऐकून मोनालिसा आणि तिचे कुटुंबीय खूप आनंदी झाले. त्यांच्या मते, या चित्रपटात काम मिळाल्यानंतर मोनालिसाच्या कुटुंबातील गरिबी संपून आर्थिक स्थिती चांगली होईल. मोनालिसाची आजीने या ऑफरवर प्रतिक्रिया व्यक्त केली. ‘नातीची अनेक वर्षांची इच्छा चित्रपटात काम मिळाल्याने पूर्ण होईल.’ अशी मोनालिसाची आजी म्हणाली.

 

महाकुंभ मेळ्यात माळा विकण्यासाठी आलेल्या इंदूरमधील या तरूणीचा फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. व्हायरल झाल्यानंतर कुंभमेळ्यात येणारा जो तो भाविक तिच्यासोबत सेल्फी काढू लागला. अनेक युट्युबर्स व्हिडीओ बनवण्यासाठी येऊ लागले. यासर्वाचा परिणाम तिच्या व्यवसायावर झाला. लोकांच्या गर्दीमुळं तिला तिचे काम करता आले नाही. त्यामुळं तिच्यावर माघारी परतण्याची वेळ आली. इंदूर झुसी परिसरात वास्तव्यास असणाऱ्या तिच्या कुटुंबाकडे मोनालिसा परत आली. मोनालिसाचे कुटुंब येथे बांधलेल्या झोपडपट्टीत राहते.

Leave A Reply

Your email address will not be published.

बातमी कॉपी करण्यापेक्षा फॉरवड करा