आज जळगाव येथे राष्टीृय चर्मकार महासंघाची बैठक.!!!
भडगाव प्रतिनिधी :-
राष्ट्रीय चर्मकार महासंघ जळगाव जिल्हा यांच्या वतीने जिल्हयातील सर्व जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, महिला आघाडी, नोकरदार आघाडी, युवक आघाडी व जेष्ठ कार्यकर्ते यांची संयुक्त बैठक राष्ट्रीय कार्याध्यक्ष समाजभुषण भानुदास विसावे यांच्या अध्यक्षतेखाली व राष्ट्रीय प्रवक्ता समाजभुषण पांडुरंग बाविस्कर यांच्या उपस्थितीत जिल्हा बैठक आज दि. २५ रोजी शनिवारी आयोजीत करण्यात आली आहे. ही बैठक जळगाव येथील शानबाग सभागृह , एम. जे. काॅलेज चौफुली येथे दुपारी १ वाजता आयोजीत करण्यात आलेली आहे. त्यासाठी सर्व पदाधिकारी व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान जिल्हा पदाधिकार्यांमार्फत करण्यात आले आहे. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. यात संत रोहिदास महाराज जयंती उत्सव आयोजित करणे.
जिल्ह्यातील नवनिर्वाचित आमदार व खासदार यांच्या सत्कार करण्याबाबत विचारविनिमय करणे.
जिल्ह्यातील तालुका अध्यक्ष व शाखा अध्यक्ष आणि नवीन कार्यकारिणी ची निवड करणे.
जिल्ह्यातील विविध आघाडीच्या नियुक्ती करणे.
समाजातील विविध स्तरावरील गुणवंताच्या सत्कार कार्यक्रम आयोजित करणे.
समाजातील सरकारी, निम सरकारी अधिकारी व कर्मचारी यांच्या सत्कार आयोजित करणे.
गाळन. ता. पाचोरा येथील चर्मकार समाजातील गरीब शेतकरी कुटुंबा वर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या जाहीर निषेध नोंदवणे.
अध्यक्षांच्या परवानगीने ऐनवेळी आलेल्या विषयांवर विचारविनिमय करणे.
बैठकीस उपस्थित राहण्याचे आव्हान समाजाचे जिल्हाध्यक्ष ईश्वरलाल अहिरे यांनी केले आहे.