भडगाव प्रतिनिधी:-
भडगाव येथे तिसरी जिल्हास्तरीय थाई बॉक्सिंग स्पर्धा दिनांक २८ डिसेंबर २०२५ रोजी यशस्वीपणे पार पडली. या स्पर्धेचे आयोजन भडगाव येथे करण्यात आले होते.
या स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, जळगाव, पाचोरा, भडगाव, जामनेर अशा विविध तालुक्यांमधून तब्बल ८० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. यामध्ये भडगाव तालुक्यातील ३० विद्यार्थ्यांचा विशेष सहभाग होता. सर्व खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत आपल्या कौशल्याचे प्रभावी प्रदर्शन केले.
सदर जिल्हास्तरीय स्पर्धा ही पुढील महिन्यात होणाऱ्या राज्यस्तरीय थाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपसाठी निवड चाचणी (Selection Trial) म्हणून घेण्यात आली होती. या स्पर्धेतून निवड झालेले विजेते खेळाडू नांदेड येथे दिनांक १० व ११ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय थाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सहभाग घेणार आहेत.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. दिनेश तांदळे सर यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्त्व व उज्ज्वल भविष्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे सर, नाजिम सर व रवी महाजन सर यांनी आपले मनोगत व्यक्त करून खेळाडूंना प्रोत्साहन दिले.
यावेळी व्यासपीठावर अँग्लो उर्दू हाय स्कुल चे मुख्याध्यापक नाजीम सर, भडगाव पोलिस उपनिरीक्षक सुशील सोनवणे,पत्रकार अबरार मिर्झा, सलाउद्दीन शेख, अॅड. सलमान मिर्झा, मंजुरी आली, असगर खान (कॉन्ट्रॅक्टर), फहीम सर, जिल्हा अध्यक्ष हाजी झाकीर कुरेशी, जिल्हा उपाध्यक्ष शाम पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी स्पर्धा पारदर्शक व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडणाऱ्या पंच व कोचेसचे विशेष कौतुक केले.
स्पर्धेसाठी बाहेरून आलेले कोचेस अतुल जाधव (वागडी), शुभम शेट्टी (चाळीसगाव), आयान खान, प्रेम देवरे, सचिन पाटील, कुसुम पाटील, दर्शना गोसावी, सागर शिंपी, प्रतीक दाभाडे, असीम खान, तनवीर मण्यार तसेच महाराष्ट्र राज्य कोच शाहरुख मण्यार यांच्या सहकार्यामुळे स्पर्धा यशस्वीपणे पार पडली.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल मुख्य प्रशिक्षक अबरार खान सर यांनी सर्व मान्यवर, पंच, कोचेस व खेळाडूंचे आभार मानले आणि कार्यक्रमाची सांगता झाल्याचे जाहीर केले.
