
भडगाव येथे शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात.!!!
भडगाव प्रतिनिधी :-
शिवसेना, युवासेना व स्व. बापुजी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भडगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम सायंकाळी श्री. छत्रपती शिवाजी महाराज चौकात जल्लोषात पार पडला.
या प्रसंगी आमदार किशोर पाटील, लोकनियुक्त नगराध्यक्षा रेखा मालचे, गटनेते लखीचंद पाटील, शिवसेना नगरसेवक विजयकुमार भोसले, देवा अहिरे, जगन्नाथ भोई, स्वीकृत नगरसेवक डॉ. प्रमोद पाटील, युवराज पाटील, प्रदीप मालचे, राष्ट्रवादीचे हर्षल पाटील, राहुल पाटील (गोंडगाव), शिवसेना शहरप्रमुख आबा चौधरी, तालुकाप्रमुख समाधान पाटील, एकलव्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय सोनवणे, दिलीप पाटील (पाचोरा), लक्ष्मीकांत पाटील (कोठली), पिंटू मराठे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक, युवासैनिक व नागरिक उपस्थित होते.
कार्यकर्त्यांनी डीजेच्या तालावर नृत्याचा आनंद घेत शिवजयंती साजरी केली. शिवाजी महाराजांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविण महाजन यांनी केले.
कार्यक्रमादरम्यान भडगाव पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.



