जळगावमहाराष्ट्रसामाजिक

कजगावात वीजपुरवठा अंधारात; विद्युत खांबासाठी आमदारांना निवेदन.!!!

कजगावात वीजपुरवठा अंधारात; विद्युत खांबासाठी आमदारांना निवेदन.!!!

भडगावता प्रतिनिधी : – आमीन पिंजारी

कजगाव येथील गट क्रमांक १४८ ब परिसरात अनेक कुटुंबे वास्तव्यास असतानाही आजतागायत नियमित विद्युत पुरवठ्यासाठी आवश्यक असलेले विद्युत खांब व वीज लाईन उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना दैनंदिन जीवनात विविध अडचणींचा सामना करावा लागत असून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

या भागातील रहिवाशांना सध्या सुमारे १५०० मीटर अंतरावरून वीज जोडणी घ्यावी लागत आहे. यामुळे आर्थिक खर्च वाढण्यासोबतच तांत्रिक अडचणीही निर्माण होत आहेत. योग्य विद्युत सुविधा नसल्यामुळे घरगुती कामकाज, विद्यार्थ्यांचा अभ्यास तसेच दैनंदिन व्यवहारांवर मोठ्या प्रमाणावर परिणाम होत आहे. विद्यार्थ्यांना रात्री अभ्यासासाठी अडचणी येत असून लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांना विशेष त्रास सहन करावा लागत आहे.

रात्रीच्या वेळी परिसरात संपूर्ण अंधार पसरत असल्याने चोरी व दरोड्यांच्या घटनांचा धोका वाढल्याची तक्रार ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही गंभीर बनला असून भीतीच्या वातावरणात रहावे लागत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

या सर्व समस्यांबाबत कजगाव येथील स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने पाचोरा–भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांना निवेदन देण्यात आले. संबंधित परिसरात तातडीने विद्युत खांब उभारून नियमित वीजपुरवठा सुरू करावा, अशी ठोस मागणी यावेळी करण्यात आली.

निवेदन स्वीकारताना आमदार पाटील यांनी सदर प्रश्न गांभीर्याने लक्षात घेऊन संबंधित यंत्रणेशी संपर्क साधून लवकरात लवकर तो मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. 

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!