जळगावमहाराष्ट्रराजकीय

भडगावच्या विकासाला नवे बळ; आमदारांच्या हस्ते कामांचे भूमिपूजन.!!!

भडगावच्या विकासाला नवे बळ; आमदारांच्या हस्ते कामांचे भूमिपूजन.!!!

भडगाव प्रतिनिधी :—

भडगाव शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देणाऱ्या बहुप्रतीक्षित विकासकामांचा आज भव्य शुभारंभ झाला. प्रभाग क्रमांक ३, ६ व ७ मधील आदर्श विद्यालय परिसरात कोल्हा नाला संरक्षण भिंतीचे बांधकाम तसेच सप्तश्रुंगी नगर, माणिक नगर व रघुनाथ नगर परिसरातील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण या महत्त्वपूर्ण कामांचे भूमिपूजन कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या शुभहस्ते उत्साहात पार पडले.

भडगाव शहरात गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या कामांमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. पावसाळ्यात कोल्हा नाल्यामुळे परिसरात पाणी साचणे, धूप होणे तसेच वाहतुकीस अडथळे निर्माण होणे अशा समस्या वारंवार उद्भवत होत्या. संरक्षण भिंतीच्या बांधकामामुळे भविष्यात पूरस्थितीवर नियंत्रण मिळून नागरिकांची सुरक्षितता वाढणार आहे.

त्याचप्रमाणे विविध वसाहतींमधील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण झाल्याने धूळ, चिखल व खड्ड्यांच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघणार असून दैनंदिन वाहतूक अधिक सुलभ होणार आहे. याचा लाभ शालेय विद्यार्थी, व्यापारी, महिला व ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणावर होणार आहे.

या प्रसंगी नगरपरिषद चे मुख्याधिकारी मंगेश देवरे,नगराध्यक्षा रेखा मालचे, उपनगराध्यक्ष राजेंद्र पाटील, गटनेते लखीचंद पाटील, आरोग्य सभापती इमरान अली सय्यद, नगरसेवक आसिम भाऊ मिर्झा,हाजी खलील मिस्त्री, अलीम शाह,अतुल परदेशी,युवराज आबा, विजयकुमार भोसले, जितू भाऊ आचारी,डॉ प्रमोद पाटील,अतुल पाटील, संतोष महाजन, राहुल ठाकरे, शिवसेना शहर प्रमुख आबा चौधरी, बबलू देवरे, नयन भोसले, मिर्झा नाजीम सर,मोहब्बत अली सय्यद, आसिफ पठाण,यांच्यासह सर्व नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विकासकामांबाबत समाधान व्यक्त करत आमदारांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.

कार्यक्रमात बोलताना आमदार किशोर आप्पा पाटील म्हणाले, “भडगाव शहराचा सर्वांगीण विकास हेच आपले प्रमुख उद्दिष्ट आहे. शहरातील मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, येणाऱ्या काळात आणखी विकासकामे मार्गी लावली जातील.”

या विकासकामांच्या शुभारंभामुळे भडगाव शहराचा चेहरामोहरा बदलण्यास सुरुवात झाली असून, शहर विकासाच्या या नव्या पर्वाचे नागरिकांनी मनापासून स्वागत केले आहे.

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!