लाडकी बहीण योजनेतून वगळले जाणार बोगस लाभार्थी; सरकारचा नवा नियम जाहीर
मुंबई : महायुती सरकारची महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजना सध्या मोठ्या चर्चेत आहे. विधानसभा निवडणुकीत महत्त्वाची ठरलेली ही योजना आता सरकारसाठी आर्थिक भार ठरत असल्याने सरकारने कठोर पावले उचलली आहेत.
योजनेसाठी आता नवीन नियम लागू करण्यात आले असून, फक्त महिलांचे उत्पन्न नव्हे तर संपूर्ण कुटुंबाचे उत्पन्न तपासले जाणार आहे. विवाहित महिलांच्या बाबतीत पतीचे आणि अविवाहित महिलांच्या बाबतीत वडिलांचे उत्पन्न बघितले जाईल.
जर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा जास्त असेल, तर संबंधित महिला योजनेसाठी अपात्र ठरणार आहे.
सरकारने बोगस लाभार्थ्यांवर कारवाई करण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य केली आहे. लाभार्थींनी लवकरात लवकर e-KYC पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
✅ ई-केवायसी प्रक्रिया सोपी:
ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
e-KYC बॅनरवर क्लिक करा.
आधार क्रमांक व OTP टाकून पडताळणी करा.
पुढे पती/वडिलांचा आधार क्रमांक व OTP टाकून प्रक्रिया पूर्ण करा.
या नियमामुळे अनेक महिलांना योजनेतून वगळले जाणार असून, पात्र महिलांनी वेळेत प्रक्रिया पूर्ण केली तर त्यांचा लाभ सुरू राहणार आहे.