स्वस्थ नारी – सशक्त परिवार अभियानांतर्गत भडगाव ग्रामीण रुग्णालयात भव्य आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न.!!!
स्वस्थ नारी – सशक्त परिवार अभियानांतर्गत भडगाव ग्रामीण रुग्णालयात भव्य आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न.!!!
भडगाव प्रतिनिधी :-
ग्रामीण भागातील महिलांना व रुग्णांना तज्ज्ञ वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अंजली हॉस्पिटल, भडगाव यांच्या वतीने भडगाव ग्रामीण रुग्णालय येथे भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात स्त्रीरोग, प्रसूतिशास्त्र, हाडांचे विकार तसेच इतर आजारांवरील तपासण्या व उपचार करण्यात आले.
उद्घाटन प्रसंग
या शिबिराचे उद्घाटन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पंकज जाधव व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी विविध मान्यवर, वैद्यकीय अधिकारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते.
शिबिरातील प्रमुख तपासण्या व सेवा
शिबिरात महिलांसाठी व गरोदर मातांसाठी खालील तपासण्या व उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या :
मासिक पाळीतील समस्या व तक्रारींचे निदान
पाळीमध्ये अतीप्रमाणात रक्तस्राव, पांढरे पाणी जाणे इत्यादींची तपासणी
गरोदर स्त्रियांची संपूर्ण तपासणी व मार्गदर्शन
प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतरच्या सेवा
स्तनातील गाठींचे निदान व उपचार
नॉर्मल तसेच सिझेरियन डिलेव्हरी सुविधा
वंध्यत्व निवारण उपचार
स्त्रियांच्या कर्करोग निदान तपासण्या
वेदनारहित व सुलभ प्रसूती सेवा
लॅप्रोस्कोपी उपचार सुविधा
गर्भाशयाचे विना टाक्याचे ऑपरेशन
हाडांचे विकार व त्यावरील उपचार
तज्ज्ञ डॉक्टरांची उपस्थिती
अंजली हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करून योग्य मार्गदर्शन केले. त्यामध्ये
डॉ. दिव्या साळुंखे (MBBS, MS – OBGY)
डॉ. विशाल गायकवाड (MBBS, F.I.C.M – Intensive Care Medicine)
डॉ. रोहन पाटील (MBBS, DNB, BMD – Orthopedic Surgeon)
यांचा समावेश होता.
नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
या शिबिराला ग्रामीण भागातील महिलांनी व रुग्णांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शेकडो रुग्णांनी तपासण्या करून घेतल्या व तज्ज्ञांकडून सल्ला मिळवला. अनेक रुग्णांना तत्काळ आवश्यक उपचार उपलब्ध करून देण्यात आले.
शिबिराच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना व सर्वसामान्य नागरिकांना आधुनिक वैद्यकीय सेवा व तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन मिळाले. त्यामुळे आरोग्याबाबत जागरूकता निर्माण होऊन “स्वस्थ नारी – सशक्त परिवार” या अभियानाचा उद्देश यशस्वी झाल्याचे समाधान आयोजकांनी व्यक्त केले.