भडगाव अँग्लो हायस्कूल शिक्षक भरती वादात आमनुल्ला खान यांचा व संचालक मंडळाचा विजय.?
धर्मदाय उपायुक्त जळगांव यांनी मा.चेअरमन गटाचा फेरफार अर्ज फेटाळला
भडगाव अँग्लो हायस्कूल शिक्षक भरती वादात आमनुल्ला खान यांचा व संचालक मंडळाचा विजय.?
धर्मदाय उपायुक्त जळगांव यांनी मा.चेअरमन गटाचा फेरफार अर्ज फेटाळला
भडगाव प्रतिनिधी :-
भडगाव अँग्लो हायस्कूलच्या शिक्षक भरती प्रक्रियेवरून सुरू असलेल्या संस्थेच्या अंतर्गत वादात निर्णायक कलाटणी आली आहे.मा. चेअरमन कादिर खान जोरावर खान यांच्या तर्फे अर्जदार म्हणून मुखातर शाह यांनी सचिव आमनुल्ला खान यांना पदावरून कमी करण्यासाठी दाखल केलेला फेरफार अर्ज (क्र. 1092/19) जळगावचे मा. धर्मदाय उप आयुक्त यांनी सुनावणीनंतर फेटाळला.
या आदेशामुळे सचिव आमनुल्ला खान व विद्यमान चेअरमन मिर्झा आसिम बेग व्हाईस चेअरमन जाकीर शेठ व संचालक मंडळ यांना मोठा दिलासा मिळाला असून, विरोधी गटाला धक्का बसला आहे.
मा चेअरमन कादिर खान यांचा दुसरा फेरफार अर्ज देखील ना मंजूर झाला आहे
दरम्यान, कादिर खान यांच्या वतीने अर्जदार म्हणून मुन्साफ खान इसा खान यांनी दाखल केलेला फेरफार अर्ज क्र. 1533/2019 बाबत धर्मदाय आयुक्तांनी 17 ऑक्टोबर 2024 रोजी आदेश देत सन 2014 ते 2019 या करिता असलेले नाव परिशिष्ट वरून कमी करण्याचे निर्देश दिले आहेत.
यांनतर मा. चेअरमन कादिर खान यांच्या संचालक.मंडळानी सदर आदेश आव्हान देण्यासाठी नाशिक आयुक्त कडे धाव घेतली आहे
नवीन कार्यकारी मंडळाची पुढील हालचाल उत्सुकतेत
या संपूर्ण घडामोडीनंतर संस्थेची सर्वसाधारण जबाबदारी विद्यमान चेअरमन आसिम बेग हकीम बेग व्हाईस चेअरमन जाकीर शेठ यांच्या खांद्यावर आहे. संचालक मंडळातील पुढील घडामोडी, नवीन धोरणात्मक निर्णय, आणि शालेय व्यवस्थापनाच्या पातळीवरील हालचालीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.