देशमुख महाविद्यालयात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.!!!
भडगाव प्रतिनिधी :-
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात भारतीय स्वातंत्र्याचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.
याप्रसंगी संस्थेचे ज्येष्ठ संचालक विजय देशपांडे, सौ. सु. गि. पाटील माध्यमिक विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक अरुण पाटील, सेवानिवृत्त तालुका कृषी अधिकारी ए. डी. जाधव, सेवानिवृत्त प्राध्यापक पी. डी. पाटील, प्रा. एस. आर. पाटील, डॉ. ए. एन. भंगाळे, महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, प्राध्यापकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक डॉ. दिनेश तांदळे यांनी संचलन केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.