जामनेर : बेटावद खुर्द मॉब लिंचिंग – मुख्य आरोपींना तात्काळ अटक, मकोका व संगनमत कलम लागू करण्याची एकता संघटनेची मागणी

0 73

जामनेर : बेटावद खुर्द मॉब लिंचिंग – मुख्य आरोपींना तात्काळ अटक, मकोका व संगनमत कलम लागू करण्याची एकता संघटनेची मागणी

जळगाव प्रतिनिधी :-

जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथे ११ ऑगस्ट २०२५ रोजी घडलेल्या अमानवी मॉब लिंचिंग प्रकरणातील मुख्य आरोपी, जो राजकीय प्रभावशाली मानला जातो, याला अद्याप अटक झालेली नाही. यामुळे जनतेत तीव्र संताप व्यक्त होत असून, जळगाव जिल्हा एकता संघटनेने जिल्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना निवेदन देऊन तात्काळ अटकेची मागणी केली आहे.

निवेदनात संघटनेने नमूद केले आहे की आरोपी हा संघटित टोळीचा भाग असून, त्याच्यावर गंभीर गुन्ह्यांचा इतिहास आहे. त्यामुळे भा.दं.सं. कलम १२०(ब) म्हणजे बी.एन.एस. ६१(२) अंतर्गत कटकारस्थानाचा गुन्हा व महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) लागू करून कठोर कारवाई करावी. तसेच प्रकरणाचा तपास तातडीने विशेष तपास पथक (SIT) कडे सोपवावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

एकता संघटनेच्या ठाम मागण्या :

मुख्य आरोपी व कॅफे चालकास तात्काळ अटक

भा.दं.सं. कलम १२०(ब) / बी.एन.एस. ६१(२) अंतर्गत कटकारस्थानाचा गुन्हा दाखल

मकोका लागू करणे

तपास SIT कडे सोपवणे

पीडित कुटुंबास २५ लाख रुपयांची आर्थिक मदत व एका सदस्यास सरकारी नोकरी

साक्षीदार संरक्षण योजना लागू करणे

सीआरपीसी २४(८) अंतर्गत पीडिताच्या निवडीप्रमाणे विशेष सरकारी वकील नेमणे

या प्रसंगी पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनीही SIT व संगनमत कलम वाढविण्याबाबत आश्वासन दिले.

निवेदन देताना संघटनेचे मुफ्ती खालिद, फारुक शेख, हाफिज रहीम पटेल, मतीन पटेल, अनिस शाह, अन्वर सिकलगर, मजहर पठाण, आरिफ देशमुख, मौलाना इमरान, रज्जाक पटेल, मौलाना कासिम नदवी, खान शकील, अरबाज शेख, इरफान शेख, हसन सैयद, उमर पटेल, नजमोद्दीन शेख, गुफरान शेख यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

निवेदनाच्या प्रती गृहमंत्री, आपत्ती व्यवस्थापन मंत्री, अल्पसंख्यांक आयोग, मानव अधिकार आयोग, पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक, जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांना देखील पाठवण्यात आल्या आहेत.

फोटो कॅप्शन :

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी चर्चा करताना फारुक शेख व निवेदन देताना मुफ्ती खालिद सह शिष्टमंडळ.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!