स्मार्ट मीटरचा गाजावाजा, ग्राहकांवर ₹1,045 कोटींचा बोजा.!!!
परवानगीशिवाय बसवले जाताहेत मीटर; संतापाची लाट, आंदोलनाची चेतावणी. •••
स्मार्ट मीटरचा गाजावाजा, ग्राहकांवर ₹1,045 कोटींचा बोजा.!!!
परवानगीशिवाय बसवले जाताहेत मीटर; संतापाची लाट, आंदोलनाची चेतावणी. •••
सातारा प्रतिनिधी :–
महावितरणने जिल्ह्यातील 8 लाख 70 हजार 875 वीज ग्राहकांच्या जुन्या मीटरऐवजी स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरू केले आहे. प्रत्येकी सुमारे ₹12 हजार आकारले जाणार असून, एकूण भार ₹1,045 कोटी 5 लाखांवर जाणार आहे.
ग्राहकांच्या परवानगीशिवाय किंवा चुकीची माहिती देऊन मीटर बसवल्याचे आरोप होत आहेत. ग्रामीण भागात या मोहिमेला तीव्र विरोध होत असून, वीज कायदा 2003 च्या कलम 55 नुसार स्मार्ट मीटर बसवणे बंधनकारक नसतानाही हे काम सुरु आहे.
याआधी प्रीपेड मीटरच्या निर्णयाला नागरिकांनी विरोध केल्यानंतर तो मागे घ्यावा लागला होता. आता पुन्हा स्मार्ट मीटरच्या माध्यमातून बोजा टाकल्याचा आरोप आहे. कृषी वर्गातील 2,17,702 ग्राहकांना मात्र सूट मिळाली आहे.
संघटनांनी इशारा दिला आहे की, बेकायदेशीर मोहीम तातडीने थांबवली नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल.