चाळीसगाव परदेशी, राजपुत समाज उन्नती मंडळाची वर्षाची आमसभा दि. २४ रोजी.गुणवंत विदयार्थ्यांचा सत्कार सोहळा.!!!
चाळीसगाव परदेशी, राजपुत समाज उन्नती मंडळाची वर्षाची आमसभा दि. २४ रोजी.गुणवंत विदयार्थ्यांचा सत्कार सोहळा.!!!
चाळीसगाव प्रतिनिधी:-
येथील परदेशी, राजपुत समाज उन्नती मंडळ या संस्थेची वर्षाची आम सभा दि. २४/८/२०२५ रोजी रविवारी संस्थेचे अध्यक्ष भरतसिंग देवचंद छानवाळ यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. ही सभा चाळीसगाव येथील राजपुत मंगल कार्यालय लक्ष्मीनगर येथे दुपारी १२ वाजता आयोजीत करण्यात आलेली आहे. या सभेत समाजातील गुणवान, हुशार विदयार्थ्यांना इयत्ता दहावी परीक्षेमध्ये ८० टक्यांपेक्षा जास्त गुण मिळालेले असतील. व त्याच प्रमाणे शासनाच्या विविध परीक्षांमध्ये चांगले गुण मिळवुन यश मिळविलेले आहे. अशा समाजातील विदयार्थ्यांनी आपली कागदपञांसह संपुर्ण माहिती डाॅ. कर्तारसिंग परदेशी लक्ष्मीनगर चाळीसगाव या पत्त्यावर दि. २३/८/२०२५ च्या आत पाठवावी. असे आव्हान उन्नती मंडळ आयोजकांमार्फत करण्यात आलेले आहे. या सभेत समाजातील गुणंवत विदर्थ्यांसह समाजात विविध क्षेञात उल्लेखनीय कार्य केलेले आहे. अशा समाजातील जेष्ठ अन कर्तृत्वान व्यक्तींचाही सन्मान या सत्कार समारंभ कार्यक्रमात करण्यात येणार आहे.
तसेच या वार्षीक आम सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. यात मागील वार्षीक सभेचे प्रोसिडींग वाचुन मंजुर करणे. सन २०२४, २०२५ अखेर झालेल्या खर्चास व आर्थिक पञकास मंजुरी देणे. सन २०२५, २०२६ अखेर अंदाजपञक वाचुन मंजुर करणे. सन २०२४, २०२५ च्या वैधानिक लेखा परीक्षण अहवालाची नोंद घेणे. सन २०२५, २०२६ साठी वैधानिक सनदी लेखा परिक्षकाची नेमणुक करणे. समाजातील गुणवान, हुषार विदयार्थ्यांचा व मान्यवरांचा सन्मान करणे. सध्या अस्तित्वात असलेल्या शैक्षणिक संस्थेच्या मालकाने वरील मजला बांधण्यासाठी ईच्छा प्रदर्शीत केली आहे. त्या अनुषंगाने विचार करणे. जावळे येथील नियोजीत मंगल कार्यालयाचे आराखडयानुसार बांधकाम सुरु करणे. आदि विविध अजेंडयावरील विषयांवर चर्चा विनीमय करण्यात येणार आहे.
तरी या वार्षिक आम सभेस उपस्थित राहावे असे आव्हान चाळीसगाव येथील परदेशी, राजपुत उन्नती मंडळ या संस्थेचे अध्यक्ष भरतसिंग देवचंद छानवाळ, कार्याध्यक्ष डाॅ. कर्तारसिंग सरदारसिंग परदेशी, उपाध्यक्ष मथुराबाई भगवानसिंग परदेशी, खजिनदार डाॅ. जयसिंग शामसिंग परदेशी, संचालक सुभाष मन्नुसिंग महाजन, अॅड. हिरालाल पुनमचंद परदेशी, भगवान रघुविरसिंग परदेशी, अशोक महादु परदेशी, डाॅ. सुशिला कर्तारसिंग परदेशी, सचिव निलेश जयसिंग राजपुत आदि पदाधिकार्यांमार्फत करण्यात आले आहे.