माझी बदनामी करणाऱ्या वर गुन्हा दाखल करा हरिभाऊ पाटील यांचे तक्रारी निवेदन .!!!
पाचोरा प्रतिनिधी :-
बल्लाळेश्वर युवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हरीभाऊ तुकाराम पाटील यांनी 12 ऑगस्ट रोजी पाचोरा पोलीस ठाण्यात तक्रार निवेदन सादर करत अवैध गुटखा विक्रेता सनी पंजाबी याच्यावर ठोस कारवाईची मागणी केली आहे.
पाटील यांच्या मते, ते जनहितासाठी विविध गैरप्रकारांविरुद्ध तक्रारी करत असतात. यामुळे चिडलेल्या सनी पंजाबीने “पाच लाख रुपये मागितले” असा खोटा आरोप करून त्यांची सार्वजनिक ठिकाणी बदनामी केली आहे.
जून 2025 मध्ये कॉलेज गेट परिसरात पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान अंदाजे 21 लाखांचा विमल गुटखा आणि 40 पोते जप्त केले होते. वाहनचालकाने चौकशीत हा माल धुळे येथून सनी पंजाबी याच्याकडे पोहोचवायचा होता, अशी कबुली दिली होती. तरीही पोलिसांनी त्याला मुख्य आरोपी म्हणून गुन्हा दाखल केलेले नाही, असा आरोप पाटील यांनी केला.
पाटील यांनी पोलिसांकडे ठाम मागणी केली आहे की –
सनी पंजाबी याच्यावर संबंधित प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून गुन्हा दाखल करावा.
स्वतःला (पाटील) मुख्य साक्षीदार म्हणून समाविष्ट करावे.
खोट्या आरोपांद्वारे झालेल्या बदनामीबद्दल कायदेशीर कारवाई करावी.
त्यांनी पोलिसांच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले की, “अवैध गुटखा तस्करांना पोलीसच पाठीशी घालत असल्याची भावना निर्माण होत आहे.”
निवेदन देतेवेळी आप्पा हटकर व विशाल हटकर उपस्थित होते.