मध्यरात्रीचा थरार : कजगावमध्ये बिबट्याचा हल्ला, शेतकऱ्यांचे नुकसान.दोन दिवसांत दोन जनावरे ठार; गावात भीतीचे सावट.!!!
मध्यरात्रीचा थरार : कजगावमध्ये बिबट्याचा हल्ला, शेतकऱ्यांचे नुकसान.दोन दिवसांत दोन जनावरे ठार; गावात भीतीचे सावट.!!!
भडगाव ता.प्रतिनिधी : आमीन पिंजारी
कजगाव (ता. भडगाव) — अंधार पसरलेला… शेतांच्या कडेकपारीत शांतता… आणि त्याच वेळी दबा धरून बसलेला बिबट्या! अशाच थरारक पद्धतीने आज पहाटे कजगावातील शेतकरी रवींद्र शांताराम महाजन यांच्या गोठ्यात शिरून बिबट्याने अंदाजे 40 हजार रुपये किमतीची वासरी ठार केली. घटनेनंतर संपूर्ण गावात भीतीचे सावट पसरले आहे.
फक्त एक दिवसांपूर्वी, म्हणजेच 12 ऑगस्ट रोजी, शेजारच्या तांदूळवाडी गावातही बिबट्याने शेतकरी सूर्यकांत पाटील यांच्या शेतातील गाईवर हल्ला करून ती ठार केली होती. घटनास्थळी आढळलेले मोठे ठसे आणि हल्ल्याची पद्धत पाहता, हा मोठा नर बिबट्या असल्याचा अंदाज वन विभागाने व ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
गेल्या दोन दिवसांत गावालगत दोन वासरे ठार झाल्याने शेतकरी व शेतमजुरांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. त्यामुळे तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून वन खात्याकडे होत आहे.