कजगाव पोलिस मदत केंद्रावर लवकरच दोन कायमस्वरूपी कर्मचारी.ग्रामस्थांच्या मागणीला पोलिस निरीक्षक महेश शर्मा यांचे आश्वासन.!!!
कजगाव पोलिस मदत केंद्रावर लवकरच दोन कायमस्वरूपी कर्मचारी.ग्रामस्थांच्या मागणीला पोलिस निरीक्षक महेश शर्मा यांचे आश्वासन.!!!
भडगाव ता प्रतिनिधी : – अमिन पिंजारी
भडगाव पोलिस स्टेशनचे नवनियुक्त पोलिस निरीक्षक महेश शर्मा यांचा कजगाव ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. कजगाव हे तालुक्यातील प्रमुख व गजबजलेले बाजारपेठ केंद्र असल्याने येथे अनेकदा दरोडा, चोरीसारखे गंभीर गुन्हे घडत असतात. मात्र, कजगाव पोलिस मदत केंद्रावर कायमस्वरूपी पोलिस कर्मचारी नसल्याने नागरिकांना वेळोवेळी अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली.
यावेळी ग्रामस्थांनी पोलिस निरीक्षकांकडे कजगाव पोलिस मदत केंद्रावर कायमस्वरूपी पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी केली. या मागणीवर त्वरित प्रतिसाद देत पोलिस निरीक्षक महेश शर्मा यांनी लवकरच दोन कायमस्वरूपी पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
या कार्यक्रमास माजी उपसरपंच मनोज धाडीवाल, पत्रकार अमिन पिंजारी, ग्रामपंचायत सदस्य अक्षय मालचे, सामाजिक कार्यकर्ते दिनेश टेलर आदी मान्यवर उपस्थित होते.