पाचोरा महावितरण उपअभियंता लाच घेताना रंगेहाथ अटकेत.!!!
पाचोरा प्रतिनिधी :-
येथील महावितरणचे उपविभागीय अभियंता मनोज जगन्नाथ मोरे (वय ३८) यांना २९ हजार रुपयांची लाच स्वीकारताना जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १२ ऑगस्ट रोजी अटक केली.
सोलर पॅनल बसवण्याच्या कामांना मंजुरी देण्यासाठी त्यांनी एकूण ७९ हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने ११ ऑगस्ट रोजी एसीबीकडे तक्रार दाखल केली होती.
एसीबीच्या सापळ्यात त्यांनी तक्रारदाराकडून ९ हजार रुपये (नवीन कामांसाठी) आणि २० हजार रुपये (मागील कामांच्या लाचेचा पहिला हप्ता) स्वीकारला.
कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे व पथकाने केली.