कजगाव ग्रामपंचायत कार्यालयात राडा.”तडीपार झाल्यानंतरही माझं काहीच झालं नाही” म्हणत कर्मचाऱ्याला चापटा-बुक्क्या, जिवे मारण्याची धमकी.!!!
कजगाव ग्रामपंचायत कार्यालयात राडा.
“तडीपार झाल्यानंतरही माझं काहीच झालं नाही” म्हणत कर्मचाऱ्याला चापटा-बुक्क्या, जिवे मारण्याची धमकी.!!!
भडगाव प्रतिनिधी :-
कजगाव गावात सोमवारी दुपारी ग्रामपंचायत कार्यालयात अक्षरशः राडा उसळला. सरकारी कामात अडथळा आणत, संतापाच्या भरात एका इसमाने थेट कर्मचाऱ्याला चापटा-बुक्क्या लगावल्या आणि वरून “मी तडीपार झाल्यानंतरही माझं काहीच झालं नाही” अशी धडकी भरवणारी वाक्यं फेकत जिवे मारण्याची धमकी दिली.
घटना ११ ऑगस्ट रोजी घडली. फिर्यादी सुनील भाऊसाहेब पाटील ग्रामपंचायत कार्यालयात आपले नियमित काम करत होते. इतक्यात संशयित भूषण नामदेव पाटील (रा. कजगाव, ता. भडगाव) तिथे धडकले. रस्त्यावर भरत असलेल्या बाजाराबाबत तक्रार करताना त्यांचा पारा चढला आणि थेट हाणामारी सुरू झाली.
या प्रकारामुळे कार्यालयात क्षणभर गोंधळ माजला. घटनेनंतर भूषण पाटील यांच्या विरोधात भडगाव पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा, मारहाण व जिवे मारण्याची धमकी या कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास पो.हे.कॉ. किशोर सोनावणे करत आहेत.